- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
श्रीरामपूर विधानसभा (अ.जा.) राखीव मतदार संघातील भावी अपक्ष उमेदवार म्हणून दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत,
ही भेट केवळ सदिच्छा भेट नव्हती तर श्री.लोंढे यांनी आपल्या प्रत्येक सामाजिक कामाचा लेखाजोखा मांडताना श्री. जरांगे पाटील यांनी त्यांच्या प्रत्येक आंदोलनाचे कागदपत्रे व्यवस्थित तपासून पाहिली.
दत्तनगर गावातील सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी मराठा आंदोलोक मनोज जरांगे पाटील यांचा गुणगौरव करणारा स्वलिखित पोवाडा निर्माण केला त्यांचा लोकार्पण सोहळा देखील यावेळी पार पडला,
किमान १५ मिनिटे संभाषण करत मराठा समाजाची अ.नगर जिल्ह्यात नेमकी भुमिका कशी असेल,यांची संपूर्ण सविस्तर माहिती घेतली.
विधानसभा निवडणुक लढवायची का नाही हा निर्णय अजून झाला नसला तरी आपण संपर्कात रहावे
नक्कीच गोरगरीब सामान्य कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून दिली जाईल, येत्या २०२४ विधानसभा निवडणुकीत विधानसभेत गरीबांना, गरजवंताला पाठवण्यांचा प्रमाणीक प्रयत्न केला जाईल असा शब्द देतोय असेही ते म्हणाले.
या प्रसंगी अशोक वाकचौरे, सिद्धार्थ कदम, नवनाथ वाघमारे, संजय त्रिभुवन, रामेश्वर वाणी, रामदास म्हस्के, बाबासाहेब अभंग, सतिश काळे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment