- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्या भाजप खासदार अनिल बोंडे, दिल्लीचे भाजपा नेते तनविंदर सिंह, केंद्रिय मंत्री रवनित बिट्टू, आ.संजय गायकवाड यांचेवर त्वरीत कारवाई करण्यात यावी अन्यथा काँग्रेस सेवादलाचे वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा अहदनगर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक मास्टर सरवर अली सय्यद यांनी दिला आहे.
काँग्रेस सेवादल चे वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर काँग्रेस सेवादलाचे जिल्हा अध्यक्ष सुरेश झावरे, मुख्य संघटक मास्टर सरवरअली सय्यद, पाथर्डी तालुकाध्यक्ष किशोर डांगे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष शब्बीर शेख, शहराध्यक्ष रावसाहेब आल्हाट, शहर कार्याध्यक्ष रफिक शेख, पन्नालाल कुमावत,नजीरभाई (मामु) शेख, बुरहान भाई जमादार, रफिक शाह आदींसह अनेक सेवादल सैनीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment