राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, September 19, 2024

स्व.भास्करराव गलांडे पाटील स्मृतीप्रित्यर्थ आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक कारखाना संलग्न अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी आमदार भास्करराव गलांडे पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कनिष्ठ,वरिष्ठ महाविद्यालया अंतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनीता गायकवाड यांनी दिली.
         स्पर्धेसाठी सक्षम युवक: भक्कम भारत,निसर्ग हाच खरा मित्र,महिला संरक्षण आणि उपाय,पाणी हिच खरी संजीवनी, सोशल मिडीया शाप:की वरदान, अंधश्रद्धा निर्मूलन,असे विषय आहेत.स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रुपये पाय हजार व फिरता स्मृती चषक,द्वितीय क्रमांक रुपये तीन हजार व तृतीय क्रमांक रुपये दोन हजार याशिवाय उत्तेजनार्थ रुपये एक हजार, रुपये सातशे व रुपये पाचशे अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
        स्पर्धेचा उदघाटन समारंभ शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे,अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश पाटील गलांडे,अशोक पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य अंजाबापू शिंदे,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रसाद कोते,अशोक आयडियल स्कूलचे प्राचार्य रईस शेख,अशोक इंग्लिश मेडियम स्कूलचे प्राचार्य संपतराव देसाई,या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.तर पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत,सहसचिव भास्करराव खंडागळे, मुळा प्रवरा इलेक्ट्रिक सोसायटी चे संचालक सिद्धार्थ मुरुकुटे अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी मंजुश्री मुरकुटे आणि अहमदनगर जिल्हा क्रिडा अधिकारी माननीय श्री.भाऊराव वीर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड, स्पर्धा संयोजक प्रा.दिलीप खंडागळे, सहसंयोजक श्री बाबासाहेब पटारे, ग्रंथपाल डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment