राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, September 18, 2024

उंदीरगांव येथे ईद ए मिलाद उत्साहात संपन्न सर्वधर्मीयांचा ईद उत्साहात उत्स्फूर्त सहभाग


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
तालुक्यातील उन्दिरगाव येथे हरिगांव - उंदीरगाव येथील मुस्लीम बांधवांनी गणपती विसर्जनाचा दिवस जाणीवपूर्वक टाळून दुसऱ्या दिवशी दि. १८ सप्टे.रोजी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती ( ईद ए मिलाद) निमित्त हरिगांव जामा मस्जिद ते उंदीरगाव मस्जिद अशी मिरवणूक शांततेत काढली, त्यात सर्व आबालवृद्ध तरुण तथा हिंदू धर्मीय बांधव सहभागी झाले होते. हरिगांव बाजारपेठेतील सर्व हिंदू धर्मिय बांधवांनी मिरवणुकीचे उत्साहात स्वागत केले. मिरवणूकचे उन्दिरगांव येथील श्री हनुमान मंदिर जवळील मस्जिद याठिकाणी विसर्जन होऊन प्रसाद वाटप करण्यात आले.
याप्रसंगी सर्व धर्मियांनी आपले मनोगत व्यक्त करून ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक राजेंद्र पाउलबुद्धे यांनी सांगितले की, मागचे आठवत तेंव्हापासून या उंदीरगाव, हरिगाव मध्ये भाईचारा कायम आहे. एकमेकांच्या उत्सवात आनंदाने सहभागी होतात.यापूर्वीही बाहेरी घटनांचे परिणाम या गावात सर्व धर्मियांनी होवू दिले नाही. मुस्लीम बांधवांनी कायमच संयमाची भूमिका घेतली.त्यांना धन्यवाद असे ते म्हणाले.
       अशोक चे माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे यांनीही आपल्या शुभेच्छापर मनोगतात बोलताना सांगितले की,जसा यामध्ये जपला गेला तसा यापुढेही जातीय सलोखा येथे कायम राहील असे सांगत त्यांनी आपल्या शुभेच्छापर मनोगतात शुभेच्छा व्यक्त केल्या.
संचालक वीरेश गलांडे पा. म्हणले की, मी लहानपणापासून पाहतो आहे तथा पूर्वजांनी देखील जातिय सलोखा प्रस्तापित करण्याचे सांगितले आहे, येथे जातीयवादाला कधीच थारा दिला जाणार नाही असे ते म्हणाले.
        नानासाहेब गलांडे यांनीही ईदसाठी सर्वाना शुभेच्छा दिल्या,आर्मी जवान शफीक शेख म्हणाले की, आम्ही सीमेवर तैनात असताना देशावर वाईट नजर ठेवणाऱ्यांच्या विरोधात लढतो आहोत, प्रथमतः आपण सर्व भारतीय आहोत हे प्रत्येकाने समजून घेत आचरणात आणले पाहिजे असे ते म्हणाले.
          काझी इसाकभाई यांनी प्रेषित हजरत मोहमद पैगंबर जयंती निमित्त आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, इस्लाम धर्माची शिकवण अतिशय सुंदर आहे, सर्वांना बरोबर घेवून चालणारी आहे असे त्यांचे संस्कार व शिकवण यावर मनोगत व्यक्त केले. 
         यावेळी यावेळी राजेंद्र पाउलबुद्धे,दिलीप गलांडे, बाबासाहेब गलांडे,सरपंच जितेंद्र गोलवड,निपुंगे,दिलीप नाईक,आप्प्पा गुळवे,नाना खरात,मोहम्मद इसाक, इसाक इनामदार,बशीर तांबोळी,भैय्या मणियार, स्मित तांबोळी,समीर मुन्ना सय्यद,नूरकलम तांबोळी, सादिक शेख आदी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे, शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
=================================
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment