- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात शुक्रवार (ता. २०) सप्टेंबर रोजी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या कंपनीकडून डिप्लोमा ट्रेनि या पदाकरिता या मुलाखती घेण्यात येत आहेत. अशोक पॉलिटेक्निक पदविका उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या पदांकरिता अर्ज करू शकतात. रोजगाराच्या शोधात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांनी केले आहे.
लोकनेते माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात केमिकल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत डिप्लोमा ट्रेनि या पदाकरिता शुक्रवारी (ता. २०) सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता मुलाखतीचे आयोजन केले आहे. केमिकल इंजिनीअरिंग शाखेतील पदविका / पदवीधर / पदवी शिक्षण घेतलेले विद्यार्थी या पदांकरिता मुलाखती देऊ शकतात. अनुभवी त्याचप्रमाणे नुकतेच शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या कंपनीत नोकरीची संधी मिळणार आहे. याकरिता इंग्रजी भाषेतील उत्तम ज्ञान असण्याचे कौशल्य आवश्यक आहे. दहावी, बारावी व पदविकेच्या परीक्षेत ६० टक्के पेक्षा जास्त गुण तसेच पदविका पूर्ण सत्र उत्तीर्ण असलेले पात्र विद्यार्थी या पदाकरिता अर्ज करू शकतात. या प्लेसमेंट कॅम्पसचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. अरुण कडू, विभाग प्रमुख प्रा. महेश नवपुते आदींनी केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment