- माजिद खान - नाशिक -/ वार्ता -
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन कारवाईत २ घातक हत्यारे व रु. ८३६५/- किंमतीची अवैध देशीदारुचा माल जप्त करण्यात आले.
श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर गुन्ह्यांना प्रतिबंध करणेसाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारां विरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले आहे. त्यादृष्टीने, नाशिक पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ -२ मधील पो. स्टे. हद्दीत दि.२९/१०/२०२४ रोजी ७ ते १० वाजेच्या दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबविणे साठी श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांनी, सहाय्यक पोलीस आयुक्त, अंबड व नाशिकरोड विभाग तसेच पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते.
श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्री. शेखर देशमुख, सहाय्यक
पोलीस आयुक्त, अंबड विभाग व डॉ. सचिन बारी, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग यांनी अधिनस्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक कोम्बिंग ऑपरेशन राबवून खालील प्रमाणे कारवाई करुन घेतलेली आहे.
१. रेकॉर्डवरील २०७ गुन्हेगार चेक करुन, मिळून आलेल्या गुन्हेगारांकडे चौकशी करुन त्यापैकी ३६ गुन्हेगारांचे चौकशी फॉर्म भरुन घेण्यांत आले. तसेच ४४ हद्दपार इसमांना चेक करण्यांत आले.
२. अवैध शस्त्रसाठा शोध अंतर्गत ६२ गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यांत आलेल्या आहेत.
३. सातपुर व अंबड पो. स्टे. हद्दीत अनुक्रमे इसम नामे मयुर पोळकर, व हासिम खान यांचे ताब्यात घातक हत्यार (कोयते) मिळून आल्याने भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे ०२ गुन्हे दाखल करण्यांत आले आहे.
४. अंबड, एम. आय. डी. सी. चुंचाळे चौकी, उपनगर, नाशिकरोड व देवळालीकॅम्प पो. स्टे. हद्दीत, ०५ इसमांचे ताब्यात विनापरवाना देशीदारुच्या बाटल्या, एकुण किंमत रु. ८३६५/- चा माल मिळून दारुबंदी कायदयान्वये ०५ गुन्हे दाखल करुन कारवाई करण्यांत आली आहे.
५. सातपुर पो. स्टे. हद्दीत कोटपा कायदयान्वये ०७ इसमांवर कारवाई करण्यांत आली आहे.
६. टवाळखोर १३ इसमांवर म. पो. का. कलम ११२/११७ प्रमाणे कारवाई करण्प्यांत आली आहे.
७. ४३ समन्स व २२ वॉरंटची बजावणी करण्यांत आली आहे.
८. मोटार वाहन कायदयान्वये ९७ इसमांवर कारवाई करण्यांत आली आहे.
विधानसभा आचारसंहिता कालावधीत रेकॉर्ड वरील माला विरुध्द, शरिरा विरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, ऑलआउट, नाकाबंदी, इत्यादी कारवाईत चेक करुन, घडझडत्या घेवून तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन परिणामकारक अशी कारवाई मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली नियमित सुरु राहणार आहे असल्याचे श्रीमती मोनिका नं. राऊत, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २, नाशिक शहर यांनी सांगितले आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================