राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, October 10, 2024

उद्योगविश्वातला ध्रुवतारा निखळला उद्योगपती रतन टाटा यांचं निधन



- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 रतन टाटा यांनी आपलं आयुष्य गोर गरीब मुलांना शिक्षण, सामान्य नागरिकांना मोठ मोठ्या दवाखान्यांमध्ये निधी देऊन आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे व गोरगरिबांचे लग्न लावुन देणे या सारख्या सामान्य मानसाच्या गरजा भागवल्या, भारतीय उद्दोजकाला महत्त्व पुर्ण चालना दिली.

देशातील प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी प्रदीर्घ आजारानं निधन झालं आहे. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनकच होती. अखेर त्यांनी बुधवारी (ता.९) रात्री उशिरा टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला.

दोन दिवसांपूर्वीच रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होते. त्यांच्या अनेक शारीरिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. डॉ. शाहरुख हे एक नामांकित डॉक्टर म्हणून ओळखले जातात.

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला होता. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा आणि आईचे नाव सुनी टाटा होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले होते. शिमल्याच्या बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण झाले. त्यानंतर परदेशात शिक्षण घेतले. त्यांची एकूण ३,८०० कोटी रुपये त्यांची संपत्ती आहे.

काही दिवसांपूर्वी रतन टाटा यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रकृती विषयीची माहिती दिली होती.त्यात त्यांनी वयोमान लक्षात घेता माझ्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, काळजी करण्यासारखं काहीही नाही, असं टाटा यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

देशाच्या कानाकोपऱ्यातून रतन टाटांच्या प्रकृती स्वास्थासाठी व ते लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना केल्या जात होत्या. सोशल मीडियातून त्यांच्यासाठी 'गेट वेल सून' यांसारख्या मेसेजद्वारे पोस्ट केले जात होते. टाटा कंपनीच्या माध्यमातून लाखो कुटुंबांचं त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं होत. अनोखी देशभक्ती व देशहिताचं उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या निधनानं भारताचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यांच्या दुःख द निधनाबद्दल श्रीरामपूर येथील आजी माजी सैनिक संघर्ष समिती च्यावतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment