- प्रवरानगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील गावाच्या प्रवेशद्वारापासून तर गावापर्यंत जे डिव्हायडर टाकले आहे ते सर्वसामान्यांना मनस्ताप ठरत आहे.
तरी सदर डिव्हायडर ग्रामपंचायत काढून घ्यावे अशी मागणी माजी सरपंच गणेश चेचरे यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गावच्या प्रवेशद्वारापासून ग्रामपंचायत डिव्हायडर टाकून रस्ता बनविला परंतु त्या रस्त्याच्या एका बाजूला वाहतूक बंदच आहे . त्या बाजूने बेकायदेशीर काही माणसे वाहन उभी करतात तर काही बांधकाम साहित्य आणून टाकतात.
त्यामुळे एका बाजूचा हा रस्ता पूर्णपणे बंद आहे.
त्यामुळे एका बाजूने सुरू असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे ह्या रस्त्यावरून गावांमध्ये शाळा व गावाचा एकमेव प्रमुख रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते शेतकरी वर्ग दूध उत्पादक शेतकरी कामगार वर्ग सकाळी या रस्त्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते रस्त्याने जात येत असल्यामुळे गावचा प्रमुख रस्त्यावरच डिव्हायडर मुळे मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झालेला आहे. तरी सदर डिव्हायडर ग्रामपंचायतने काढून रस्त्याला मोकळा श्वास निर्माण व्हावा आशा मागणी सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चेचरे ग्रामपंचायत सदस्य बळीराम चेचरे सोसायटी सदस्य किरण चेचरे माजी सरपंच गणेश चेचरे. गणपत चेचरे. यांनी केली आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार कोंडीराम उंडे - लोहगांव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
*युवा नेते डॉक्टर सुजय दादा विखे पाटील हे लोहगांव येथील एका कार्यक्रमा निमित्त आले असता त्यांच्या कानावर सदर डिव्हायडरचा विषय घातला असता त्यांनी सदर डिव्हायडर काढण्याच्या सूचना केलेले आहे.*
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
*डिव्हायडर मुळे अपघात होण्यास ची शक्यता नाकारता येत नाही. डिव्हायडर मुळे रस्ता झाला अरुंद वाहतुकीची कोंडी सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप,डिव्हायडर झाल्यापासून एका बाजूचे रस्ता पूर्णपणे वाहतुकीस बंद आहे.*
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
No comments:
Post a Comment