राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 9, 2024

भूमी फाउंडेशनच्या कन्याची सारथी स्कॉलरशिपसाठी निवड


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पुणे (वाघोली) येथील भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून असंख्य सेवाभावी मान्यवरांच्या सक्रिय सहकार्य आणि लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास या ब्रीद वाक्याद्वारे शैक्षणिक क्षेत्र , सामाजिक क्षेत्र ,ग्रामीण भाग विकास,विधवा निराधार महिलांसाठी व त्यांच्या मुलींसाठी राज्यस्तरीय अविरत स्वरूपाचे कार्य करीत आहेत.त्याचबरोबर संस्थेचे पुणे वाघोली येथे असंख्य गरजू , होतकरू, गरीब शेतकऱ्यांच्या मुलींसाठी मोफत निवासी वसतीगृह चालविले जात आहे.यामध्ये प्रामुख्याने राहणे, खाणे, शिक्षण आणि इतर शैक्षणिक सुविधा उत्तम प्रकारे पुरविल्या जात आहे. संस्थेच्या सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृह वाघोली पुणे येथील दोन्ही दोन्ही हाताने अपंग असलेली परंतु जिद्दी, मेहनती शेतकरी कुटुंबातील जयश्री संजय गायकवाड या मुलीची सारथी स्कॉलरशिप साठी नुकतीच निवड झाली आहे. सदर झालेली निवड पाहता कौतुकास्पद असल्याचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आणि सर्व पदाधिकारी यांनी सांगितले आहे.त्याच बरोबर जयश्री ही मुलगी स्वतःची कामे सर्व स्वतःच करते.हे इतर मुलींसाठी खूप आदर्शदायी आहे.असेही पवार यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर सर्व पदाधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी यांनी सदर कन्येचे अभिनंदन केले आहे. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समत न्यूज सर्व्हिसेस,
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment