- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
स्व. डॉ.वा.ग.तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या नावाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळणे हा माझ्या जीवनातील एक प्रेरणापूर्ण, भूषणावह असा सन्मान असल्याचे मत प्रख्यात एम.डी.(पॅथॉलॉजी) डॉ. दिनानाथ पाटीलबा खपके यांनी व्यक्त केले.
येथील मेनरोड वरील आगाशे सभागृहात विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व. डॉ. वा.ग. तथा बाबासाहेब कल्याणकर यांच्या ११५ व्या जयंती निमित्ताने व्याख्यानमालेचे चौथे वर्ष आणि स्व.डॉ. वा.ग. तथा बाबासाहेब कल्याणकर स्मृती राज्यस्तरीय धन्वंतरी पुरस्कार २०२४ प्रदान सोहळा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्याप्रसंगी पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. दिनानाथ खपके बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश मेहकरकर, डॉ. राजीव शिंदे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ.बाबुराव उपाध्ये उपस्थित होते.
प्रारंभी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक,सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार केले. प्रतिष्ठान उपाध्यक्ष व समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. तसेच स्व. डॉ. वा.ग.तथा बाबासाहेब कल्याणकर एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व म्हणून व्याख्यान दिले.
चंद्रपूर जिल्ह्यातील उसगावसारख्या खेड्यातून १९३९ साली श्रीरामपूर येथे येऊन वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी जी लोकप्रियता मिळविली, ती वंदनीय आहे. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान हे गेल्या ०४ वर्षापासून त्यांच्या नावाने व्याख्यानमाला चालवत आहेत. डॉ. बाबासाहेब कल्याणकर हे विश्वानाथ सुकळे यांचे मोठे बंधू तर सुखदेव सुकळेसरांचे ते चुलते होते.डॉ. कल्याणकर यांचे अनंत ऋ्ण मानून सुकळेसर असे उपक्रम राबवितात ही उच्चतम संस्कृती असल्याचे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.
यावेळी डॉ. राजीव शिंदे यांनी डॉ.खपके यांच्या वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला.
प्रमुख पाहुणे डॉ. प्रकाश मेहकरकर यांनी डॉ.खपके यांचे पॅथॉलॉजी सेवेतील गुणवत्तेचे कौतुक केले. डॉ. दिनानाथ खपके यांनी आपले जीवनानुभव सांगत प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी खपके परिवार आणि अनेक स्नेहीजन उपस्थित राहून त्यांनी सन्मान केल्याबद्दल डॉ. खपके यांनी आभार मानले.
प्राचार्य शेळके यांनी यानिमित्ताने एका देवमाणसाचा सन्मान झाला, डॉ. खपके यांचे वडील शिक्षण क्षेत्रातील एक भूषणावह व्यक्तिमत्त्व आहे, तोच सेवेचा संस्कार डॉ. खपके यांना मिळाला हे गौरवास्पद आहे. यावेळी डॉ. दिनानाथ खपके,डॉ.सौ. वैशाली खपके यांना मानपत्र, शाल, बुके, पुस्तके देऊन सन्मानीत करण्यात आले. मानपत्राचे वाचन डॉ. शिवाजी काळे यांनी केले. यावेळी पाटीलबा खपके सह परिवारातील सर्व उपस्थित होते.
प्राचार्य शंकरराव अनारसे, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, माजी तहसिलदार गुलाबराव पादीर, डॉ. दिलीप पडघन, डॉ. सौ. सिंधू पडघन, प्रा. शिवाजीराव बारगळ, सौ. अरुणा बारगळ, प्रा.कु. हर्षला बारगळ,डॉ. भास्कर निफाडे, दत्तात्रय रायपल्ली, ह.भ.प. प्रा.सखाराम कर्डिले, माजी मुख्याध्यापक भागचंद औताडे, भागवतराव मुठे, दत्तात्रय चव्हाण, डॉ.रवींद्र कुटे, प्रा.लड्डू शेख, सौ. मोहिनी काळे, कुंडलिक फापाळे, पी.एस. वाणी, साहेबराव सुकळे, सुरेश बुरकुले, संजय कल्याणकर, संजय बुरकुले, बाळासाहेब बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, सुयोग बुरकुले, डॉ. अजित घोगरे, रावसाहेब भिंगारदिवे, अड, संदीप खपके, लक्ष्मण भंडारी, कैलास चिंधे, विशाल निकडे, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, सुरेश गड्डेगुरुजी, शशिकांत गायकवाड, राजू साळवे, डॉ. संजय अबक, डॉ. अजित फुलवर, संतोष खपके, जयराम खपके, अर्जुन खपके, दिलीप होन, मेजर रवींद्र खपके, भाऊसाहेब खपके, सुधाकर रोकडे, जयकुंवर रोकडे, डॉ. संतोष झडे, डॉ. जावेद शेख, शैलेश खरात, संजय जगताप, दादासाहेब महाडिक, डॉ. भिटे, डॉ. विनोद येणगे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शिवाजी काळे यांनी केले तर प्रा. शिवाजीराव बारगळ यांनी आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment