राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, October 3, 2024

नेहरुनगर रहिवाशांची गत झाली मोठी केवीलवाणी !अन् नळांद्वारे येवू लागले चक्क गटारीचे पाणी !!


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शहरातील गोंधवणीरोड नेहरुनगर मधील नगरपालिका नळांना चक्क गटारीचे पाणी मिश्रीत दुर्गंधीयुक्त घाण पाणी येत असल्याने रहिवाशांना मोठ्या मनस्तापाचा सामना करणे भाग पडत आहे.
सदरील प्रकार हा केवळ आजचा नसुन नेहरूनगर वासियांना वर्षानुवर्ष या त्रासाला सामोरे जाणे भाग पडत आहे, गोंधवणीरोड रस्त्यालगत वॉर्ड क्रमांक १, पंजाबी कॉलनीच्या बाजुने असलेली ही नळ पाण्याची पाईपलाईन चक्क गटारालगत असल्याने शिवाय खुपच जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज झालेली आहे,
वेळोवेळी गटारी चॉकअप होवून सदरील पाईपलाईन मध्ये जाऊन सदरील नळाद्वारे रहिवाशांना चक्क गटारीचे पाणी पिणे भाग पडत आहे.याविषयी नगर पालिका प्रशासनाकडे 
अनेक तक्रारी दिल्यानंतर थातूर - मातूर पद्धतीने सदरील लिकेज काढले जाते, मात्र महिना - दोन महिन्याने पुन्हा ये रे माझ्या मागल्या याप्रमाणे परिस्थितीत काही बदल होत नाही.
शेवटी कुठवर गटारीचे पाणी मिश्रीत दुर्गंधीयुक्त घाण पाणी प्यायचे? असा प्रश्न वेळोवेळी निर्माण होत असल्याने नेहरुनगर वासियांची गत मोठी केवीलवाणी झाली असल्याचे बघावयास मिळते आहे.
सध्या शहरातील नेहरुनगर परिसरात थंडी. ताप, खोकला अशा विविध अजारांनी लोकं खुपच त्रासले आहेत,पुढे भयंकर साथीच्या आजारांचा फैलाव होवू नये याकरीता नगर पालिका प्रशासक तथा प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, नुतन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आणी संबंधित नगर पालिका प्रशासनाने वेळीच योग्य पावले उचलत सदरील नळाद्वारे येत असलेल्या गटारीच्या घाण पाण्याचा त्वरित कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शौकतभाई शेख यांच्यासह परिसरातील नागरीकांकडून केली जात
 आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

*नगर पालिका प्रशासनाकडून तात्काळ दखल*
तक्रारीनंतर तात्काळ नगर पालिकेतून श्री.साळवे साहेबांचा मला कॉल आला,आणी ते स्वतः ही क्षणात उपस्थितही झाले, सदरील प्रकरणी संबंधित ठिकाणी गटारीवरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाले असल्याने लिकेज शोधणे मोठे जिकरीचे ठरणार असल्याने शक्यतो प्रयत्न करुन लिकेज काढले जाईल असे ते म्हणाले. मात्र सदरील पाईपलाईन फारच जुणी असल्याने महिना, दोन महिन्यांत नवीन कामांमध्ये ती बदलण्याचे काम होईल असेही ते म्हणाले.
करीता श्रीरामपूर आरोग्य सेवा ग्रुप ऐडमिन आणी नगर पालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार तथा धन्यवाद.- शौकतभाई शेख 
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

No comments:

Post a Comment