श्रीरामपूर ता श्रीरामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन'च्या वतीने जागतिक फार्मासिस्ट सप्ताहानिमित्त लोकमान्य टिळक वाचनालय येथे आज (दि.२) महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्ताने फोटोला अभिवादन करून श्रीरामपूर नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्रक तसेच हॅन्ड ग्लोज, गम बूट, मास्क व इतर स्वच्छता साहित्त्याचे १५० साहित्य किट वाटप करण्यात आले.
अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन दिल्लीचे जनसंपर्क अधिकारी श्री अजित पारख, सेंट्रल झोनचे उपाध्यक्ष शशांक रासकर, अहमदनगर जिल्हा असोसिएशनचे सदस्य माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी, बाळासाहेब ढेरंगे, श्रीरामपूर असोसिएशनचे अध्यक्ष सुजित राऊत, कोविल खेमनर, आनंद कोठारी, उदय बधे, जालिंदर भवर, लोकमान्य टिळक वाचनालय ग्रंथप्रमुख स्वाती पुरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
श्रीरामपूर शहराला स्वच्छ ठेवून शहरवासीयांना चांगले आरोग्य सेवा देत सर्वसामान्य नागरिकांची आरोग्याची काळजी घेणारे सर्व स्वच्छता कर्मचारी यांच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी कुठलेही साहित्य नाही. हाताने गटारी स्वच्छ करत असताना निर्देशनास आल्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष सुजित राऊत यांनी असोसिएशनच्या वतीने वरील साहित्य देण्याचे ठरविले.
आपण सर्व शहर स्वच्छ करून शहराला स्वच्छता व आरोग्य सेवा देता व आम्ही रुग्णांना औषधे देऊन रुग्णांची सेवा करतो, म्हणजे दोघेही सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे समाज घटक असल्याचे प्रतिपादन अजित पारख यांनी केले.
हा कार्यक्रम जरी फार्मासिस्टदिन व सप्तानिमित्त होत असला तरी वर्षभर या संघटनेचे सर्वसामान्यांना उपयोगी येतील, असे विविध उपक्रम, वृद्धाश्रमात, शाळांमध्ये लागणाऱ्या वह्या, पुस्तकांपासून जे काही साहित्य या दैनंदिन जीवनामध्ये परिस्थिती नसलेल्या पालकांना, विद्यार्थ्यांना, समाजाला त्या वस्तू पुरवून आमची ही संघटना 'समाजसेवा हीच ईश्वर सेवा' हे ब्रीदवाक्य घेऊन नेहमी कामामध्ये सज्ज असते, असे सांगून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले काम करा, मास्क वापरा, गटारी स्वच्छ करताना हॅन्ड ग्लोज वापरा, चेंबर स्वच्छ करताना पायात बूट घाला, स्वतःची व स्वतःच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या, एकजुटीने रहा, असे आवाहन माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांनी केले.
लवकरच कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून आम्ही कायम आपल्या सोबत असून कुठल्याही प्रकारची आरोग्याविषयी अडीअडचणी असल्यास आमच्याशी संपर्क करा, असे आवाहन शशांक रासकर यांनी यावेळी केले.
याप्रसंगी जालिंदर भवार, रवींद्र चौधरी, संदीप टूपके, प्रशांत उचित, प्रशांत कोठारी, माधव आसणे, प्रदीप डावखर, दीपक उघडे, शशिकांत गौड, अशपाक शेख, रियाज पोपटिया, महावीर कोठारी, विनीत होले, राहुल कुरे, पंकज हिरण, कमल मीलानी, संदीप कांबळे, सचिन चुडीवाल, प्रशांत रसाळ, हुसेन कुरेशी, संजय नारंग, ऋषी साळुंखे, नंदलाल मोटवानी आदीसह केमिस्ट बांधव उपस्थित होते. सुजित राऊत यांनी स्वागत तर कोविल खेमनार यांनी आभार मानले.
प्रशासनाचे दुर्लक्ष...
आरोग्य कर्मचारी शहर स्वच्छ ठेवत असताना त्यांना लागणारे हॅन्ड ग्लोज, गम बूट, मास्क, गटारीतील घाण वाहण्यासाठी हातगाड्या व आरोग्य विमा इतर वेगवेगळे साहित्य पुरवणे हे नगरपालिकेचे व ठेकेदाराचे कर्तव्य आणि काम आहे. कामगारांना सर्व साहित्य पुरवणे तर सोडाच परंतु एखादी संस्था साहित्य देत असेल तर ते स्वीकारण्यासाठी निरोप देऊन सुद्धा आरोग्य अधिकारी श्री आरणे व इतर कोणीही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, याच्यापेक्षा काय शोकांतिका आहे. आरोग्य अधिकाऱ्याच्या मुजोरी, व मनमानी कारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे नगरपालिका प्रशासनाकडून पूर्णपणे दुर्लक्षित होत आहे.
-- रवींद्र गुलाटी, माजी उपनगराध्यक्ष, श्रीरामपूर
No comments:
Post a Comment