- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अधिपत्याखालील अशोक सहकारी बँकेला सन २०२३-२४ या वर्षासाठी अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ट कामकाज करुन एन.पी.ए. चे प्रमाण कमी केल्याबद्दल बी.आय.एन.जी.एस. पुरस्कार, तर बँकेच्या कार्यक्षम प्रशासनाबद्दल दुसरा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे असोसिएशनचे अध्यक्ष सत्येनजी मुंदडा तसेच मालपाणी उद्योग समुहाचे प्रमुख राजेश मालपाणी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे साई थिम पार्क या ठिकाणी झाले. पुरस्कार स्विकारणेसाठी बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब हळनोर, संचालक अॅड.उमेश लटमाळे, व्यवस्थापक प्रदिप थोरात, उपव्यवस्थापक विजय राठोड आदी उपस्थित होते. याप्रसंगी बँकेच्या कामकाजाबद्दल असोसिएशनने कौतुक केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment