- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
आयुष्यभर ज्ञानग्रहण करून आपल्या यशस्वी जीवनाचा पाया रचणारे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ.कलाम यांचा भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र विकासाच्या प्रयत्नांमध्ये खूप मोठा सहभाग होता. बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासावर केलेल्या कामामुळे ते भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले. १९९८ मध्ये भारताच्या पोखरण-अणुचाचण्यांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका बजावली, असे मत प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी व्यक्त केले.
अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ.संदीप सांगळे यांनी पुस्तक प्रदर्शन आयोजित केले होते. प्रारंभी प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी डॉ.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमासाठी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.दिलीप खंडागळे, ग्रंथपाल डॉ.संदीप सांगळे, परीक्षा अधिकारी प्रा.शरद आवारी, प्रा.भिमा शिंदे, डॉ.विवेक साळवे, प्रा.सुनील म्हकांळे, प्रा.सुधीर शेरकर, प्रा.स्वप्नील लांडगे, प्रा. ज्ञानेश्वर खिलारी, प्रा.राणी पटारे, प्रा.संगीता खंडिझोड, प्रा.मंदा तांबे, प्रा.हिना शेख, कार्यालयीन अधिक्षक बाबासाहेब पटारे आदींसह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment