गुन्हेशाखा युनिट क. १ ची कारवाई
- माजीद खान - नाशिक -/ वार्ता -
हल्ली चोऱ्यांचे प्रमाण खुप वाढल्याचे दिसून येत आहे, एस.टी.बस अथवा इतर प्रवासी वाहनातून प्रवास करताना महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून (चेन सिनॅचिंग) नेणे,असे प्रमाण दिवसेंदिवस जास्त प्रमाणात घडत असल्याचे दिसून येते आहे.
नाशिक मध्ये असाच एक प्रकार दिनांक २६/१०/२०२४ रोजी दुपारी ०१:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बस स्टॅण्ड नाशिक येथे घडला. मुंबई ते नंदुरबार बसमध्ये चढत असतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र हे झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादयाच्या संमती शिवाय लबाढीच्या इरादयाने चोरून नेले होते, म्हणून दिनांक २६/१०/२०२४ रोजी फिर्यादी यांनी देवुन सरकारवाडा पोलीस ठाणे येथे। २६८/२०२४ भा.व्य. संहीता ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.
नाशिक शहरामध्ये ठक्कर बाजार, मुंबईनाका या बसस्टॉप परिसरात गर्दी वाढत असुन या गर्दीचा फायदा घेवुन चोरटे हे प्रवाशांच्या बॅगेतील सोने व रोख रक्कम चोरी करण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांनी सुचना दिल्या होत्या. मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हेशाखा, मा. श्री. संदिप मिटके, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन केले होते.
सदर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे गुन्ह्याचे गांभिर्य पाहता सदर गुन्हा हा मा. पोलीस आयुक्त यांनी गुन्हे शाखा युनिट क्रं.१ कडे वर्ग केल्याने गुन्हेशाखा युनिट क्रमांक १ कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे तपास करीत असतांना पोहवा /१८८३ विशाल काठे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्हे हे रेकॉर्ड वरील गुन्हेगार करीत असुन ते दिनांक २७/१०/२०२४ रोजी ठक्कर बसस्थानक या ठिकाणी येणार आहेत अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड यांना देवून त्यांच्या मार्गदर्शना नुसार गुन्हे शाखा युनिट ०१ कडील सपोनि / हेमंत तोडकर, पोउनि/रविंद्र बागुल, पो. हवा. / प्रशांत मरकड, विशाल काठे, विशाल देवरे, सुकाम पवार अशांनी ठक्कर बाजार बसस्थानक या ठिकाणी सापळा लावुन थांबले असता बातमीदाराने दिलेल्या वर्णनाप्रमाणे इसम हा ठक्कर बाजार बसस्थानक या ठिकाणी येताना दिसला असता नमुद पथकाने सदर इसमास मोठ्या शिताफीने त्यास पकडले व त्यास नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव साहिल निसार पठाण, वय-२३ वर्षे, रा-वार्ड नं ०२, ता. श्रीरामपुर जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यास गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता आरोपी ने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन आरोपीने अटके दरम्यान गुन्ह्यांची कबुली दिली असुन आरोपीने गुन्ह्यातील गेला माल ३,५०,०००/- रूपये किंमतीची ४.५ तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत करून खालील गुन्हे उघडकीस आणले आहे.
१) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २४३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
२) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २५०/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
३) सरकारवाडा पोलीस ठाणे गुरनं २६८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे
४) सरकारवाडा पोलीस ठाणे गुर्न २०२/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे
५) मुंबईनाका पोलीस ठाणे गुरनं १९३/२०२४ भा. न्या. सं. कलम ३०३(२) प्रमाणे
असे एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी यास पोलीस कस्टडी रिमांड मिळाला आहे. सदर आरोपीकडून नाशिक शहरातील या सारखे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रविंद्र बागुल, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, गुन्हेशाखा युनिट ०१ नाशिक शहर हे करीत आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप-आयुक्त श्री. प्रशांत बच्छाव, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मधुकर कड, सपोनि/हेमंत तोडकर, पोउनि / रविंद्र बागुल, पो. हवा. / प्रशांत मस्कड, विशाल काठे, विशाल देवरे, सुकाम पवार, शरद सोनवणे, संदिप भांड, प्रविण वाघमारे, प्रदिप म्हसदे, जगेश्वर बोरसे यांनी केली आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१२२
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment