- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथे वीजेच्या तारीचे घर्षण होऊन सात एकर ऊस जळून खाक झाला आहे, वर्षभरातील ही दुसरी घटना आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलास सिताराम पवार यांच्या मालकीचे वडाळा महादेव - खोकर शिवारात गट नं २३३ क्षेत्र असून सदर ठिकाणी ऊस लागवड केलेली आहे सदरचे ऊसाचे पिक हे जोमात असुन परिसरातील शेतीमधून विजेच्या तारांच्या माध्यमातून वीज पुरवठा सुरू असतो, या ठिकाणी विजेच्या तारेचे घर्षण निर्माण होऊन वीजेचे लोळ निर्माण झाले,यामुळे शेतकरी सुजित कैलास पवार तसेच प्रवीण कैलास पवार यांच्या मालकीचे सात एकर ऊसाचे क्षेत्र जळून खाक झाले आहे.
येथील परिसरातील श्री.उघडे हे नेहमी प्रमाणे शेताशेजारून जात असताना संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला, घटनेचे गांभीर्य ओळखत श्री. उघडे यांनी तात्काळ कैलास पवार तसेच माजी सरपंच सचिन पवार, इंजि. सुजित पवार यांना घटनेची माहिती दिली तसेच आगीचे लोळ वाढत असल्याने अग्निशमन बंब यांना पाचारण करण्यास सांगितले, तसेच परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत घटनास्थळी धाव घेत
आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने उग्र रूप धारण केल्याने आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर वाढत गेले. येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल पवार यांनी उघडे वस्ती व सिन्नरकर आणी पवार वस्ती येथील नागरीकांना मदतीसाठी फोनवरून माहिती दिली,
मोठ्या प्रमाणावर आगीचा तांडव सुरू असल्याने अग्निशमन बंब पोहोचू पर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, काही दिवसापूर्वी याच ठिकाणी अशाच प्रकारे नुकसान झाल्याने येथील शेतकरी श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंड तसेच कैलास पवार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना याविषयी माहिती दिली होती. वेळोवेळी माहिती देऊनही संबंधित गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ऊस शेती पिकाचे प्रचंड असे नुकसान झाले आहे.वारंवार अशाच प्रकारच्या घटना घडत असल्याने वडाळा महादेव येथील शेतकरी व नागरीकांमधून महावितरण विषयी प्रचंड नाराजीचा सूर निघत आहे.
यावेळी कैलास पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. चंद्रकला पवार, इंजि. सुजित पवार,प्रवीण पवार यांनी सदरील बाबी दुर्घटनेमध्ये प्रचंड असे नुकसान झाले असून भरून न येणारे असल्याची माहिती दिली. तसेच अनेक वेळा माहिती देऊनही टाळाटाळ करत असल्यानेच आमचे नुकसान झाले असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment