नाशिक प्रतिनिधी : माजिद खान
ऑल इंडिया तहेरीक फरोगे इस्लाम, भिवंडी तर्फे राज्यस्तरीय सिरत - ए - मुस्तफा परिक्षा ११ शहरांमध्ये तीन हजाराहून अधिक स्पर्धकांसाठी आयोजित करण्यात आली होती. नाशिकमध्ये जेएमसीटी कॉलेज कॅम्पसमध्ये आयोजित सदर परीक्षेसाठी वय वर्ष १२ ते ७५ पर्यंत मुले मुली, महिला पुरुष अशा ८०० हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूण १०० गुणांच्या या परीक्षेत ८० गुणांची बहुपर्यायी प्रश्न तर २० गुणांसाठी दीर्घोत्तरी प्रश्न होते. बहूपर्यायी उत्तरासाठी ओ.एम.आर. शीट देण्यात आले होते.
नाशिक परिक्षा केंद्रावर नाशिक जिल्हा व जिल्ह्याबाहेरील परिक्षार्थी उपस्थित होते. महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या इमारतीमध्ये आसन व्यवस्था करण्यात आली होती. जेएमसीटी संस्थेचे अध्यक्ष हाफिज हिसामुद्दीन खतीब यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेली परिक्षा अतिशय पारदर्शी पद्धतीने संपन्न झाली. मुंबईचे मुफ्ती मोहम्मद अख्तर रजा मिस्बाही व कारी मोहम्मद आसिफ रजा बरकाती यांचे हस्ते प्रश्न पत्रिका व उत्तर पत्रिकांचे पाकीट उघडून उदघाटन करण्यात आले. करिअर काउंसलर व मोटिवेशनल स्पीकर आसिफ शेख सर यांनी परिक्षा अधीक्षकाची मुख्य जबाबदारी पार पाडली व आवश्यक मार्गदर्शन केले. नाज़ीम शेख यांनी समन्वयकाची भूमिका बजावली.
जेएमसीटी संस्थेचे विश्वस्त हाजी जाहिद खतीब, हाजी रऊफ पटेल, हाजी साबीर खतीब, शेखन खतीब, अहसान खतीब, आरिफ मन्सुरी, जेएमसीटी पॉलिटेक्निकचे प्राचार्य हमीद अन्सारी, जेएमसीटी इंटरनेशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका चित्रा घस्ते व शबाना शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जेएमसीटी च्या एकूण ५० शिक्षकांनी पर्यवेक्षकाचे काम पहिले. तर शिक्षकेतर कर्मचारी देखील कार्यरत होते. तहरीकतर्फे मुफ्ती साजिद पटेल, हुसेन अन्सारी, परवेझ अन्सारी यांनी परिश्रम घेतले. सदर परीक्षेत प्रथम क्रमांकासाठी उमराह, बगदाद व बैतुल मुकद्दस पॅकेज, द्वितीय पारितोषिक उमराह व बगदाद पॅकेज तर तृतीय पारितोषिक उमराह पॅकेज दिले जाणार आहे. तसेच अन्य १०० पारितोषिके देखील दिले जाणार आहेत. परीक्षेचा निकाल व पारितोषिक वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment