*काय म्हणावे याला*
देखणे ते चेहरे
प्रांजळांचे आरसे !
गोरटे की सावळे
या मोल नाही फारसे !!
बा. भ. बोरकरांची ही आपल्या बालपणी शिकलेली कविता सहजच निवांत बसल्यावर आठवली आणि मग डोळ्यासमोर तरळून गेले कित्येक असे चेहरे की ज्यांचे वर्णन करायला शब्द कुठून आणावेत हाच प्रश्न पडावा. कारण की मनाला प्रश्न पडतो की प्रांजळपणाचे रुपडे धारण केलेली माणसे सुद्धा आतून किती भयंकर असतात याचे अनुभव प्रत्येकाने कधी न कधी घेतलेल्या असतात तर याउलट खाष्ट वाटणारी माणसे सुद्धा आतून मनाने किती निरागस असतात हाही अनुभव आलेलाच असतो. वय वाढेल तसे माणसाने म्हातारे होण्याऐवजी जेष्ठ व्हावे आणि हे जेष्ठत्व माणसाच्या वागण्यातून दिसावे बोलण्यातून कळावे. पण नेहमीच असे होते असे नाही आणि मग बोलण्यात आणि वागण्यात विरोधाभास दिसला की त्या माणसा बाबतीत कशावरच विश्वास ठेवावा वाटत नाही. म्हणूनच आपल्या मराठी भाषेत एक म्हण रुढ झालेली आहे ती म्हणजे
*पांघरून खुळ आणि आत्माराम शहाणा*
माणूस कोणताही असो त्याला स्वतःच्या फायद्याचं अगदी एखाद्या येड्या गबाळ्याल्या ही सांगावे लागत नाही. पण त्यातल्या त्यात माणसांमध्ये काही अंशी खरेपणा असतो. काहींची तत्त्व ठरलेली असतात आणि तत्त्वाने वागणारी माणसे, स्वार्थी माणसांसाठी नेहमीच अडचणीची ठरतात. काही फुकट मिळते म्हटल्यावर अथवा दुसऱ्यांकडून मिळते म्हटल्यावर मुक्तहस्ताने घेणारी माणसे स्वतः द्यायची वेळ आली की रडतात कुडतात आणि झापेपणाचा आव आणतात. अशा माणसांशी जवळीक नसलेलीच बरी. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ही म्हण खरी असली तरी सुद्धा माणसानं स्वतः थोडं शहाणं व्हावं, जाणतं व्हावं. आपला मुखवटा इतरांच्या केव्हाच लक्षात आलेला आहे याची जाणीव ठेवून वागावं.असे म्हणतात की
*ज्याची बुद्धी क्षीण*
*आणि ज्याची वृत्ती हीन*
अशा माणसाचा राग मनात ठेऊ नये. पण मी तर म्हणेल की अशा माणसाविषयी लोभ ही मनात ठेवू नये.
*तेच डोळे देखणे जे*
*कोंडीती साऱ्या नभा !*
*ओळीती दुःखे जनांच्या*
*सांडीती नेत्रप्रभा !!*
बोलण्यातून आपण किती सहृदयी आहोत हे दाखवायचे आणि प्रत्यक्ष कृती करायची वेळ आली की मग मात्र कसलाही विचार न करता काहीही ठोस मदत करायची नाही,अशी सवय बऱ्याच जणांना असते.. आपण जी मदत करतोय त्याने एक चांगले कार्य पार पडणार आहे आणि पुण्य आपल्यालाच लागणार आहे, याचे भान ठेवले तर असा स्वार्थीपणा थोडा कमी होईल. अशी माणसे सडेतोडपणे बोलत नाहीत की समोरच्यावर रागावत नाहीत कारण त्यांना त्यांच्या कद्रूपणाची चांगली ओळख झालेली असते. काटकसर आणि कंजूसपणा यात जमीन आसमानचा फरक आहे.. बरं आपलं द्यायचं नाही तर आपणही लोकांचं घेऊ नये हा साधा नियम ही ते आपल्या स्वार्थीपणाबाई डावलतात. समूहाच्या विरोधी जाण्यात काहीच गैर नाही जर आपण काही चांगले करत असू तर. पण चांगल्या कामातही आपण मोडता घालत असू तर आत्म परीक्षण करायलाच हवं. सगळी च माणसं सारखी नसतात. बहुतांश लोक ही मोठ्या मनाची आणि दिलदार ही असतात.पण अशा तऱ्हेवाईक माणसांना धडा शिकवायला वेळ आली तर मागे पुढे पाहू नये. त्यांना वेळोवेळी जाणीव करून देणे गरजेचे आहे की
*माणूस म्हणून जगताना*
*काही पथ्य पाळायला हवीत*
*माणूस म्हणवून घेताना* *काही कुपथ्य टाळायला हवीत*
जीवननितांत सुंदर आहे फक्त कुणासाठी कधीतरी निस्वार्थी भावनेने काही तरी करून पाहा.म्हणूनच शैलेंद्र आपल्या एका कवितेत असे म्हणतात की
*कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे*?
*कृष्ण व्हावे की कर्ण व्हावे*?
*जे आपले असते तेच द्यावे !*
*की द्यावे तेही आपले रहावे!!*.
*कर्ण व्हावे की कृष्ण व्हावे*?
*कृष्ण व्हावे, हो, कृष्णच व्हावे*
*कधी कुणाचे कवच व्हावे* !
*कधी कुणाचे कुंडल व्हावे*!!
=================================
-----------------------------------------------
*लेखन*✍️✅🇮🇳...
सुजाता नवनाथ पुरी
अहील्यानगर - 8421426337
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर
बा./जा.संपर्क क्र. 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment