वाहन चालवताना कोणतेही व्यसन करू नये - उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील उप प्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी नववर्षाचे स्वागत करत दुचाकी, चारचाकी वाहनधारक यांची तपासणी करत आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवत नेवासा रोडवरील सर्व प्रवासी यांना थांबवून मार्गदर्शन करत व्यसनापासून दूर राहावे तसेच दुचाकी चालकांनी हेल्मेट डोक्यावर परिधान करणे यासोबतच वाहन चालवताना लायसन्स, वाहनाचे पेपर सोबत व्यवस्थित ठेवणे, मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, जेणेकरून कुटुंबातील सर्वांची जबाबदारी आपल्यावर असल्याने वाहन चालवतानी खबरदारी घ्यावी अशा विविध प्रकारच्या सूचनाही श्री. जोशी यांनी दुचाकी चारचाकी वाहनधारक नागरिकांना दिल्या, तसेच नवीन वर्षाचे स्वागत करताना वाहनधारकांना दूध प्राशन करण्यास दिल्याने प्रवासी वर्गातून आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, सदरच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने परिसरामधून उपप्रादेशिक अधिकारी अनंता जोशी यांचे तसेच समवेत असलेले सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त करण्यात आले. यापूर्वी अशा पद्धतीने कारवाई तसेच व्यसनमुक्तीचा संदेश जनजागृती अभियान राबविले नसल्याचे नागरिकांमधून चर्चा सुरू होती, यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पांडुरंग सांगळे, कुणाल वाघ,अतुल गावडे, रोशन चव्हाण, श्रीमती राणी सोनवणे तसेच वाहन चालक गणेश गांगोडे,रवींद्र बनकर, बद्रीनाथ कोकाटे,अनिल दुर्ग, सतीश भांबरकर,संदीप पाळंदे समवेत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष परदेशी, पोलीस नाईक किरण टेकाळे, पो. कॉं. प्रवीण कांबळे, गृह रक्षक दलाचे चंद्रकांत मोरकर, राजेंद्र देसाई, रेवन्नाथ पेठे आदींनी यामध्ये सहभाग घेतला.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================