- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच लोकशाहीचे मजबुतीकरण झाले. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे आणि सामाजिक परिवर्तन घडविणारे डॉ.आंबेडकर हे खर्या अर्थाने युगप्रवर्तक होते, असे प्रतिपादन अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त माजी आ.श्री.मुरकुटे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, श्रीमती रमाबाई धिवर, युवा नेते नीरज मुरकुटे, अमोल कोलते, कैलास भागवत, ज्ञानदेव वर्पे, बाळासाहेब शिंदे, सर्वज्ञ मुरकुटे, सार्थक चौधरी, पंकज देवकर आदी उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment