राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, December 7, 2024

गुरूदेव डॉ.काटेस्वामीजी नागरी सह.पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 शहरातील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन दिनदर्शिकाचे प्रकाशन श्रीरामपूर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. व्ही.एन. ताके पाटील यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध महाले हे होते तर प्रतिथयश लेखापरीक्षक डी. बी. मोरगे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी व भारतमाता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नूतन दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना ऍड. ताके म्हणाले की, संस्थेने सतरा वर्षांच्या वाटचालीत सभासद हिताचा कारभार केलेला असून सभासद व ठेवीदारांचे हित जपलेले आहे तसेच समाजातील गरजूंना व दुर्बल घटकांना कर्जरूपाने अर्थ पुरवठा करून अडचणीच्या काळात आधार दिलेला असून आत्मनिर्भर केलेले आहे तसेच वेळोवेळी सामाजिक बांधिलकीही जपलेली आहे व त्यामुळेच संस्था प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी डी. बी.मोरगे यांनीही आपल्या भाषणात परमपूज्य गुरूदेव महाराजांचे दिनदर्शिकामध्ये छापलेले विचार युवा पिढीला दिशादर्शक ठरतील असे मत व्यक्त केले. शेवटी अनिरुद्ध महाले यांचे अध्यक्षीय भाषण झाले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत लखोटिया यांनी केले. याप्रसंगी लोन कमिटी चेअरमन कल्पेश चोथाणी , संचालक बी .एन. पवार, बापूसाहेब गायकवाड, माऊली शेळके, मॅनेजर गिरीजा टंकसाळे, ब्रांच मॅनेजर दीपक दवंगे, निर्मला येवले, भाऊसाहेब लगे, सचिन मुठे,अभिषेक कुसळकर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment