रोजा :-नीतिमत्ता व संयमाची परीक्षा घेणारं पर्व...
प्रेषित मुहम्मद स्व. यांचे मित्र ( सहाबा ) अब्दुल्लाह बिन उमर रजि. सांगतात की, आम्हाला प्रेषितानी सांगितलं की, तुम्ही चंद्रदर्शन( चंद्रकोर )बघूनच दुसऱ्या दिवशी रोजा ( उपवास ) ठेवा, ( सहीह बुखारी 1906).
चंद्रकोर बघून सत्य सत्यता पडताळून अतिशय मनोभावे
दुसऱ्या दिवशी लगेच इस्लामच जे तिसरं अंत्यन्त महत्वाचे स्तम्भ" रोजा ", मराठी बोली भाषेत' उपवास "म्हटलं जाते, खरं तर प्रत्येक धर्मात उपवास ठेवण्याची प्रथा आहेत, फक्त्त पद्धती वेगवेगळ्या आहेत, हिंदूत प्रत्येक महिन्यात येणारे " एकादशी, द्वादशी, चतुर्थी, शिवरात्र यामध्ये हिंदू बंधू- बघीनी उपवास ठेवतात, जैन धर्मात" पर्युषन पर्व " म्हणून फारच कडक उपवास असतात तसेच ख्रिस्थन मध्ये ही चाळीस दिवसाचे उपवास असतात परुंतु उपवास ठेवणे व त्याचीच सांगता करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. जगात एक ही धर्म असा बाकी नाहीं की उपवास नाहींत.असो.
आपण ज्याला रमजान म्हणतोय रमजानतील '' रम्ज " या शब्दाचा सरळ अर्थ हा " जळणं "होतो.
या रमजान पर्वात रोज सकाळी भोर पहाटे 5:00 वाजता उठून थोडं अन्न ग्रहण ( सेहरी ) करून दिवस भर अन्न पाण्या शिवाय निरंकार राहून संध्याकाळी 6:41 मिनिटापर्यंत( इफ्तार )उपाशी राहनं म्हणजेच रोजा ठेवणं.
फक्त्त उपाशीच राहणं नव्व्हे, आपल्या सर्व वाईट सवयी,भावना, विचार, आचार, विकृती, शिवी शाप, शपथ, हो आपल्या व्यसनांना आवर घालणे सुद्धा, या सर्व गोष्टीना आवर घालणे व आपल्या मनातील सर्व वाईट गोष्टीच्या विचारांना जाळून टाकणं, आपल्या मनातील राग, मत्सर, अतिशय क्रोध, लोभ जाळून टाकणे. चोरी करणं, दुसऱ्याला त्रास होईल असे कृत करणं, शिव्या शाप देणे, कोणी लज्जीत होईल अशी कृत्य करणं,
सिगारेट, दारू, अफू, चरस, गांजा ची व्यसणं रोजा च्या माद्यमातून सोडवणं, आपल्या प्रत्येक वाईट सवयी विकृती, तसेच मनातील सर्व भावना जळमट या रामजानुल मुबारक च्या पवित्र राजा च्या सुवर्ण संधीचा फायदा उचलून चांगल्या सवयी मध्ये संगोपन, संवर्धन करणं याला च रोजा ठेवणं, तरच रोजा ठेवण्याला अर्थ. तसेच रोजा ठेवून दगाबाजी,चोरी करणं, खोटे बोलणं, हें अल्लाह ( परमेश्वर )ला मान्य च नाहीं.
"फक्त्त उपाशी राहणं अल्लाहला पसंत च नाहीं " पवित्र कुरआन (सुरह नं. 02 अल - बकराह ).
अशा रोजदारांसाठी प्रेषित मुहम्मद स्व. चे मित्र सहाबा अबू हुरेरा रजि. सांगतात, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नीं सांगितलं की, " जो रोजे ठेवून खोटे बोलेल, दगाबाजी करतात,अशा रोजा ठेवणाऱ्यांची आम्हाला अजिबात गरज नाहीं ( सहीह बुखारी 2903).
रोजा ठेवण्यासाठी आपली मनापासून मानसिक तय्यारी करणं की आज आत्ता पासून सर्व वाईट आचार -विचार -प्रवृत्ती मी सोडणारच आहेत. रमजान च्या रोजने फक्त्त धार्मिक कर्मकांड च पूर्ण न होता आपल्या मध्ये आधात्मिक सुदधीकारणच होऊन एक प्रकारे सर्व समावेश नैतिक मानवी मूल्यवर्धन वृद्धिंगत होतं असतं, नैतिक शिक्षण वाढ होते व संयम सद्गुण विकास होतात. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अंतर आत्म्यास हृदयापासून शांती मिळते. आणि हेच रोजाच फलीत म्हणावं.
( मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा )
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-=-
लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा दवाखाना ✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर
Mobile no. 9271640015
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=--=-=-
No comments:
Post a Comment