राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 2, 2025

उपेक्षितांचा अधारवड हरपला अ.भा. लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही.जी.रेड्डी यांचे निधन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
अखिल भारतीय लहुजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.व्ही.जी.रेड्डी यांचे आपल्यातून अवेळी निघून जाण्याने सामाजात कधी न भरुन येणारी मोठी पोकळीक निर्माण झाली आहे.
व्ही जी.रेड्डी साहेब हे उपेक्षितांचे आधारवड होते, ते केवळ मातंग समाजाचेच नव्हे तर प्रत्येक सामाजातील रांजले - गांजले, अन्याय पिडीत अशा पुर्णतः उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे ज्वलंत समस्या,प्रश्न सोडविण्याठी त्यांचा सातत्याने पुढाकार होता,त्यांच्या निर्पेक्ष व परोपकारी मार्गदर्शनामुळे सामाजातील अनेक उपेक्षित, दुर्लक्षित आणी अन्यायग्रस्तांना उचित न्याय मिळाला यामध्ये अ.भा. लहुजी सेने चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हानिफभाई पठाण तथा सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य पद्धतीने तथा निर्पेक्षवृत्तीने परिश्रम करण्याची त्यांनी मोठी शिदोरीच दिलेली असल्याचे समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजलीपर शोक संदेशात म्हटले आहे.
व्ही जी.रेड्डी यांचा अंत्यविधी उद्या सोमवार दि. ३ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता नांदेड येथील टाकळी येथील हिंदू स्मशानभूमीत होणार असल्याचे अ.भा. लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचीव हानिफभाई पठाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment