- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे श्रीरामपूर शहरात लवकरात लवकर आणून बसविण्यात यावे , या जागेचे भूमिपूजन होऊनही आद्यपर्यंत पुतळे बसविण्यात आलेले नाही. यासंदर्भात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून सविस्तर चर्चा करत निवेदनाद्वारे सदरील मागणी केली आहे.
डॉ. वंदना मुरकुटे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, “सदरील दोन्ही महापुरुषांचे पुतळे नाशीक येथे तयार असून नगरपालिका दरमहा भाडे रक्कम भरत असते.
या प्रश्नात प्राधान्य क्रमाने उपमुख्यमंत्री महोदय यांनी लक्ष घालून जिल्हाधिकारी यांना आदेश द्यावेत असेही डॉ. मुरकुटे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment