राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, March 1, 2025

शिक्षणातून सर्वांगीण विकास साध्य होतो- प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे. महाविद्यालयात राबविलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होतात. चांगले व्यक्तिमत्व आकाराला येऊन आपला विकास करून घेता येतो. असे विचार श्रीरामपूर येथील स्वामी सहजानंद भारतीय शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे यांनी व्यक्त केले.
         तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित माजी विद्यार्थी व पालक मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुंफा कोकाटे ह्या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉक्टर बाबासाहेब पवार, जालिंदर भांड, बापू पुजारी, आशा ओहोळ, मयूर राशिनकर, सुनील कोळसे, गोरख राशिनकर, ओम साई कॉम्प्युटरचे संचालक प्रा. दयानंद शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
      पुढे ते असे म्हणाले की, शिक्षक, पालक आणि समाज या तीनही धुवांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांची जडणघडण होते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी कायम महाविद्यालयाच्या संपर्कात राहून सामाजिक विकासात हातभार लावावा. आजी विद्यार्थ्यांना आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा करून देऊन देश विकासास हातभार लावावा. 
  यावेळी दयानंद शेंडगे, बापू पुजारी, सुनील कोळसे, अक्षय पठारे, सुशील राका, प्रा. अमृता गायकवाड या माझी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संविधान गौरव महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाच्या हरिहर या नियतकालिकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
   सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ओंकार मुळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. 
सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला.या दोन्ही मेळाव्यासाठी सर्व प्राध्यापक ,प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment