रोजा :-!!" आपल्या कुटुंबा बरोबर सेहरी करणं एक वेगळाच अनुभव..अनुभवा...!!!
"सेहरी ( भोर पहाटे ) खाणं मध्ये तुमlची भलाईच आहेत " प्रेषित मुहम्मद स्व.
हजरत अनस बिन मालिक रजि. प्रेषितांचे मित्र ( सहाबा ) सांगतात की, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं की, " तुम्ही सेहरी खात चला, तुम्हाला त्या खाण्याने बरकत आहेत ( सहीह बुखारी ह. नं. 1923)."
सकाळी (ब्राह्म वेळा )भोर पहाटे 4-30 ची वेळ असते, उठून सूर्योदया पूर्वी कष्टाच्या कमाई्तुन( हलाल )आणलेल्या अन्न धान्या तुन सकाळी अन्न ग्रहण करणं.
जैद बिन साबित रजि. हें प्रेषित्यांचे मित्र सांगतात की आम्ही प्रेषितान बरोबर रोजा ची सेहरी करून आम्ही नंतर सकाळची फर्जं (फजर )नमाज अदा केली आहेत. "
आपल्या भारतात एक म्हण फार प्रसिद्ध आहेत कीं, सकाळचा नास्ता राजा ( बादशाह ) सारखा खाणं, दुपारचं नेहारी सामान्य लोकां प्रमाणे करणं व रात्रीच जेवण भिकाऱ्या सारखं खाणं "
परुंतु ही म्हण काही अर्थी सर्वाना योग्य नाहीं होणार. असो.
सकाळी आपल्या सर्व कुटुंबाला बरोबर घेऊन आपल्या आयपतीप्रमाणे खाणं किती अविस्मरणीय अनुभव असेल.
संपूर्ण जगात उपवास ठेवण्याची प्रथा वेगवेगळी आहेत.. जसं हिंदूत चतुर्थी एकादशी, शिवरात्री किंवा काही उपवास दिवस भर काही प्रोटीन युक्त आहार व चहा पाणी घेऊन करतात तर काही निरंकारी करतात.. फक्त पोटभर खात नाहीत नंतर सध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यावर रात्री पोटभर जेवन करून उपवास सोडतात, तसेच जैन व मारवाड भागातील राजस्थानी समाज उपवास काही दोन, काही तीन तर भरपूर दिवस आपल्या शारीरिक परिस्थिती बघून ठेवून दिवस भर अन्न पाणी काहीच अन्न पाणी न घेता संध्याकाळी 24 तासात फक्त्त एक ग्लास दूध- पाणी घेऊन पुढे उपवास चालू ठेवतात किंवा सोडतात. असो.
परुंतु इस्लाम मध्ये सकाळी सेहरी करून संध्याकाळी सूर्यास्ता नंतर लागलीच च सोडतात... जवळ जवळ 12-ते 14 तासांचा रोजा असतो परुंतु काही देशात रोजे 20-22 तासांचे ही आहेत. कॅनडा देशात 22 तासांचे रोजे आहेत.
रामजानुल मुबारक चे रोजे हे संपूर्ण महिना भराचे अल्लाह नें अनिवार्य ( फर्ज) केलेलं आहेत,
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह आदेश देतात की, " हें श्रद्धांवनतांनो, आम्ही तुमच्यावर हें रोजे अनिवार्य ( फर्ज) करण्यात आले आहेत कीं, ज्या प्रमाणे तुमच्या अगोदर ( पूर्वज ) च्या प्रेषितांच्या अनुयायीवर अनिवार्य केले गेलेले होते :, यामुळे अशा आहेत की, तुमच्या मध्ये तकवा ( चरित्र मूल्य ) चे गुण उत्पन्न होतील, ( पारा नं. 01, सुरह बकराह अ. नं. 183.)
पवित्र कुर आन मध्ये अल्लाह नें आदेशच दिलेला आहेत त्याला कारण म्हणून जगामध्ये प्रत्येक मनुष्य हा चारित्र्यवाण शिलवान बनवणे, मानवातील सर्व प्रकारचं द्वेष मत्सर वाईट विकृती या नष्ट होव्यात, म्हणूच पवित्र कुर आन मध्ये अल्लाह सांगतात कीं तुमच्या मध्ये "तकवा " हें वाक्य फार महत्वाचं आहेत कीं चारित्र्य वाण शिलवान समाजाची निर्मिती करणं, समाज च्यारित्रवाण बनवणे यासाठी च मग कष्ट सोसण्याची थोडीफार सवय तर लागलीच पाहिजे.
म्हणून सेहरी मध्ये आप -आपल्या कुवतीप्रमाणे अन्न ची विशेष काळजी घेतली गेली पाहिजे, व ती घेणं गरजेचं सुद्धा आहेत कीं तीस (30) दिवस तुमचा उत्साह, उत्सपूर्तता, स्टॅमिना हा टिकला गेला पाहिजे म्हणून अन्नाची प्रत्येक प्रक्रियेत लक्ष दिले गेले पाहिजे दिवस भर थकवा जाणवू नये म्हणून संतुलित पोषण युक्त आहार घेणं गरजेचे आहे. शरीर निरोगी राहिले पाहिजे, गर्मी उन्हाळा ची सुरुवात झाली आहेत, आपल्याला अजून त्याची सवय झालेली नाहीत, सवय होईस्तर त्रास हा होणारच असतो. म्हणून संतुलित व पोषण युक्त आहारासाठी कडघान्य, ओट्स, अंडी, मटन, मासे, दुध, दही, व्हिटॅमिन युक्त, प्रोटीन युक्त, कार्बहैद्राड, मिनरल्स आहार घेणं फार गरजेचे आहेत, बँककिंग, शिजवून घेतलेलं पदार्थ जास्त महत्वाचं आहेत, ज्यांनाच जास्त प्राधान्य द्यावा,
रोजा मध्ये देहायड्रेशन होतं असतं तर त्यामुळे किडनी व इलेक्ट्रॉलाईट पातळी कमी होण्याची कधी कधी शक्यता असतं तर मिठा चं प्रमाण व पाण्याचे प्रमाण योग्य ठेवणं गरजेचं असतं
सध्याच्या काळातील फास्ट फूड च्या नादी न लागलेलं बरं होईल,, कधी कधी त्या मध्ये चवी साठीच सिनथेठीक पदार्थ जास्त टाकलेलं असतात. म्हणून आपल्याला आपल्या शारीरिक व मानसिक व आर्थिक परिस्थिती नुसार नियोजन करून आपल्या शरीराची व आर्थिक काळजी जरूर घावी.
प्रेषित मुहम्मद स्व. नी सांगितलं कीं, सेहरी खाना बरकत है, अल्लाह नें तुम्हे नवाजा है तो सेहरी खाना कभी मत छोडो : सेहरी जरूर खाया करो. "..
पुन्हा आपण विचार कराल तर, सकाळी आपण आपल्या संपूर्ण कुटंबाबरोबर आपली चटणी भाकरी ची एकत्र सेहरी खाणं किती अविस्मरणीय अनुभव असेल ना??.
फक्त्त एकदा रोजा ठेवून अनुभव नें...
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या नातेवाईक व मित्रांना जरूर पाठवा, कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.)
=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम सईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा दवाखाना, मिल्लतनगर.
श्रीरामपूर ✍️✅🇮🇳...
जिल्हा :-अहमदनगर
मोबाईल नं. 9271640014
🌷🌷👍👍👌👍👍🌷🌷
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment