राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, March 6, 2025

रमजान मुबारक, 2025 रोजा नं :- 05, गुरुवार दिनांक 06-03-2025 '" रोजा इफ्तार करणं एक अदुतीय आत्मिक समाधान. "'

रमजान मुबारक, 2025
रोजा नं :- 05, गुरुवार दिनांक 06-03-2025
"' रोजा इफ्तार करणं एक अदुतीय आत्मिक समाधान. "'

प्रेषित ( पैगंबर ) मुहम्मद स्व. मांनी सांगितलं कीं, " जेव्हा तुम्ही रोजा इफ्तार कराल तेंव्हा खजूर नें इफ्तार करावे. कारण खजूर मध्ये बरकत आहे :, जर कदाचित तुमच्या कडे खजूर नसेल तर तुम्ही दिवसभराचा रोजा पाण्याने इफ्तार करावा " हदीस तिर्मिझी शरीफ ह. नं. 657).
आपण कालच बघितलं कीं, भोर पहाटे 4-5 वाजता उठून जे काही आपल्या हलाल ( कष्टा) च्या कामायितून आणलेल्या अन्न भोर पहाटे सेहरी ( सूर्योदय पूर्वी ) करून.. दिवस भर अल्लाह च्या मर्जी साठी घाम गाळून कष्टाची कमायी करून दिवसभर मोल मजुरी, नौकरी, व्यवसाय, व्यवहार करून, ते पण अल्लाह नाराज होणार नाहीं याचीच फक्त्त क्षण क्षणी, मिनिट नं मिनिट जाणीवपूर्वक काळजी घेऊन, दिवसभर पवित्र कुर आन शरीफ चे वेळ मिळेल त्यात्या वेळी वाचन करून, अल्लाह ची जपमाळा दिवस भर मोजून, फक्त्त साक्षी अल्लाह च आहेत हें समजून आपल्या हलाल कमायितून संध्याकाळी बाजारातुन आपल्या ऐपती प्रमाणे काही फळे, काही मेवे, गोड धोड आणून संपूर्ण बसून आपल्या दोन भावांनीही एक एक फळं चहो बाजूला -वर्तुळात घेऊन चिरत कुटुंबातील म्हातारी आई वडील, छोटीशी बहीण, भाऊ, लहान लहान चिमुकली मुलं व घरातील महिलांनी बनवलेलं भजीव तळलेलं पदार्थ, हो पुन्हा त्यामध्ये आजूबाजूला असलेल्या शेजाऱ्यांना ही पाठवून.. शेजारी व कोणी दुसराही रोजा धारक असेल तर त्याला सुद्धा काही शिदोरी सह इफ्तारी पाठवतात..
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं," जो कोणी व्यक्ती रोज दाराचं रोजा इफ्तार करील त्याला खूप जास्त सबाब ( पुण्य ) भेटेल, "
त्यावर काही मित्रांनी प्रश्न उपस्थित केला कीं, हुजूर ( प्रेषित ) मुहम्मद स्व. आमच्या पैकी एकाची ही परिस्थिती अशी नाहीच कीं आम्ही दुसऱ्याला रोजा इफ्तार साठी मदत करील.. ", त्यावर पैगंबर ( प्रेषित ) नी उत्तर दिले कीं, हें पुण्याचं काम गरिबातील गरीब ही करू शकतं," साधं घरातील पाण्याच्या एका घोट का त्याला दया ' फक्त्त तुमची मनापासून मानसिकता पाहिजे.. अल्लाह फक्त्त तुमच्या मानसिकता पाहत असतो".
तुमच्या छोट्या - छोटया शुल्लक गोष्टीची दखल अल्लाह घेऊन तुम्हाला साबब, ( पुण्य ) देत असतात कारण अल्लाह ( परमेश्वर)ला प्रत्येक जीवसृष्टी ची काळजी असते, प्रत्येकाला त्यालाच देणं आहेत.
प्रत्येकाला अल्लाह नाराज होऊ नयेत म्हणून अन्न फळं, पाणी खजूर देऊन. म्हणून जगात विविध सामाजिक संघटना,काही राजकीय पक्ष, किंवा काही श्रीमंत व्यक्ती, किंवा काही सामाजिक भान असलेल्या विद्यार्थी संघटना,, मंडळ, सामाजिक ग्रुप, इत्यादी विविध मस्जिद, रेल्वे स्टेशन, रेल्वे बोगीमध्ये, किंवा गल्ली गल्ली, रोड छोटया छोटया दाना मध्ये ही साबब आहेत म्हणून इफ्तार पार्टी ठेवत असतात.
सामुदायिक रित्या बसून अल्लाह कडे दिवसभारतील झालेल्या कळत नकळत चुकांची माफी मागून अल्लाह कडे दया याचना करुणा मागनी सह संपूर्ण विश्वचे शांती,समृद्धी आरोग्यासाठी,मग तो कोणत्याही धर्माचा का असेना त्या सर्व जगासाठी प्रार्थना दुवा करून सोडलेल्या उपवासाला " इफ्तारी " म्हणतात...
यामध्ये केवळ सामुदायिक एकात मता, सामुदायिक एकोपा, समता, परस्पर काळजी घेण्याची भावना, सहकार्य,ची आपोआप च भावना निर्माण होते. खरं तर अल्लाह व प्रेषित मुहम्मद स्व यांना रोज़े व सेहरी इफ्तारितून हेच अपेक्षित आहेत.. हिच खऱ्या इस्लामची शिक्षा -संस्कार,- संस्कृती आहेत..
म्हणूनच दिवसभर रोजा ठेवून घाम गाळून आणलेल्या रोजी नें इफ्तार करणं किती आत्मिक व शब्दातीत असेल...
एखाद्याला इफ्तार करून बघा, किती आत्मिक शांतता भेटेल.!"

( 🙏मित्रांनो लेख आवडला तर जरूर आपल्या मित्रांना नातेवाईकांना पाठवा..🙏 )

=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर. जिल्हा :- अहमदनगर 
मोबाईल :- 9271640014
🌹🌹🌷🌷🌹🌹🌷🌷🌹🌹🌷🌷
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment