राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, March 13, 2025

जागतिक महिला दिनी तीन चाकी सायकल वाटप आणि कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा


एक स्त्री अस्तित्व जिथे आहे तेथे कोणतीही गोष्ट मांगल्यपूर्ण आणि विधायक असते - डॉ नयना कडू 

- उद्धव - फंगाळमेहकर -/ वार्ता -
महिला सशक्तीकरण होत असताना नारीशक्तीची वैयक्तिक शक्ती हि समूह शक्ती होते तेंव्हा राष्ट्र उभारणी करते. तर महिलां स्वतःमध्ये अपूर्व शक्ती आहे, महिलांना सक्षम स्त्री व्हावं हि सांगण्याची गरज नसून स्वतःमधील शक्तीची जाणीव व्हावी या सामर्थ्याचा समाजातील विधायकते कसा उपयोग करता येईलचे कामासाठी कसा वापर करता येईल याकरिता प्रयत्नशील असावे. एक स्त्री अस्तित्व जिथे आहे तेथे कोणतीही गोष्ट मांगल्यपूर्ण आणि विधायक असते. प्रत्येक कुटुंबात स्त्री सन्मान झाला पाहिजे तसेच अपंगांना आधार देण्याकरीतसा तीन चाकी सायकल वाटप आणि प्रतिभावंत महिलांचा सन्मान हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉ. नयना कडू यांनी वरुड (जि.अमरावती) येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि वरुड नगर परिषदच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त केले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या आंतरराष्ट्रीय संघटक मयूर देशमुख तर उद्घाटक मुख्याधिकारी प्रवीण मानकर तर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. नयना कडू उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार अर्जुन ठोसरे , माजी सभापती गिरीश कराळे , जिल्हाध्यक्ष हर्षा ढोक , शिला पाटील , मनाली तायडे , दैनिक वरुड केसरीच्या संपादिका निलम सावरकर , वरुड नगर परिषदेच्या सहायक प्रकल्प अधिकारी वंदना सुरकार, मोर्शी तालुकाध्यक्ष संध्या अमदरे,वरुड तालुकाध्यक्ष डॉ. कविता देशमुख, डॉ . श्वेता कुबडे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खासबागे, ज्येष्ठ पत्रकार प्रा.त्रिलोचन कानुंगो, तालुकाध्यक्ष योगेश ठाकरे व्यासपीठावर उपस्थित होते . जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी सात दिव्यांग महिला पुरुषांना तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले. तर समाजातील कर्तृत्ववान प्रतिभावंत महिलांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
तर टाकाऊ पासून तयार केलेल्या विकाऊ वस्तूची स्पर्धा घेण्यात येऊन उत्कृष्ट स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.यावेळी तालुक्यातील शेकडो महिलांनी हजेरी लावली होती.
कार्यक्रमचे प्रास्ताविक डॉ. कविता देशमुख यांनी तर संचालन योगिता नागमोते, रजनी काळमेघ तर आभार प्राची ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रा नंदिनी ठाकरे ,अनुराधा देशमुख , प्रणाली देशमुख , डॉ शरयू झोटिंग , वंदना सुरकार, माधुरी ठाकरे ,प्रिया लोखंडे , अर्चना सोलव, प्रतिभा देशमुख , प्रणिता चव्हाण , निशा पानसे , जयश्री फुटाणे , मंजुश्री भड शुभांगी उपासे , शैलजा वानखडे , दीपाली भुयार , संध्या वांदे , कोमल पांडव तसेच पत्रकार संघाचे प्रवीण सावरकर , तुषार अकर्ते , प्रकाश गडवे, निलेश लोणकर तुषार खासबागे निखिल बावणे सह आदींनी परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार प्रविण सावरकर - वरुड
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment