यशस्वी महिलांना पाठिंबा देणाऱ्या घरातील पुरुषांचे आभार- सौ मनीषा महाले
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील बळीराम पाटील विद्यालय येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून शासकीय आय. टी. आय. ( एस.सी.पी.) कॉलेजच्या शिल्प निदेशिका सौ. मनिषा महाले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री. एम.डी. श्रीमंगले होते. व्यासपीठावर शालेय कार्यकारिणी सदस्या श्रीमती माधुरी राठोड, श्रीमती पी. एल. उदावंत, श्रीमती जे.के.फुलेलवाड, श्रीमती सोनवणे, श्रीमती बीडवई यांची उपस्थिती होती.
दीपप्रज्वलानंतर श्रीमती जे.के.फुलेलवाड यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. श्रीमती माधुरी राठोड यांनी महिला दिनानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
प्रमुख अतिथी सौ. मनीषा महाले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या मुलींसोबतच मुलांवर वयानुरूप योग्य संस्कार होणे गरजेचे आहे. यशस्वी महिलांच्या मागे नक्कीच घरातील पुरुषांचा पाठिंबा असतो. महिलांना पाठिंबा देणाऱ्या पुरुषांचे त्यांनी आभार मानले. आपल्या आईला, ताईला महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या का, इत्यादी प्रश्न विचारत त्यांनी मुलांना बोलते केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी कु. जानवी सरकटे हिने जर आभार प्रदर्शन कु.तन्वी पाटील हिने केले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment