- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
आपल्या शैक्षणिक कार्यातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या शिक्षक शिक्षिका यांना असबाक पब्लिकेशन पुणे, समर फाउंडेशन मालेगाव, मावीया एज्युकेशन ट्रस्ट अहमदाबादच्या वतीने दिला जाणारा "असबाक शैक्षणिक पुरस्कार" सोनई जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या शिक्षिका शेख नाजेमाबेगम नवाब यांना समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य बद्दल जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात हा पुरस्कार समर फाउंडेशनचे अध्यक्ष अश्फाक उमर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी नगरपालिका श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,माजी सभापती पंचायत समिती वंदनाताई मुरकुटे, अहमदनगर उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीमखान पठाण, उपाध्यक्ष इमाम सय्यद, सचिव आबीद दुलेखान सदस्य बदर सर, सहेली ग्रुपच्या नर्गीस इनामदार आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना शेख नाजेमा म्हणाल्या की कामाचे कौतुक झाल्यावर अजून जोमाने काम करायला बळ मिळते.काम करतानाही असेच समाजामधून सहकार्य मिळाल्यास भविष्यात पण विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.
कार्यक्रमात शिक्षकांवर सध्या वाढलेल्या अनेक कामाचे ताणतणावात पण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा मान्यवरांनी आपल्या भाषणातून गौरव केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहमदबदर शेख यांनी केले.प्रास्ताविक अहमदनगर जिल्हा उद्धव साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले. तर आभार आबिद खान यांनी मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment