विषय :- नमाज --तारविहच्या एका -एका शब्द- वेळेचं सत्तर पटीने पुण्यांची ऑफर चा फायदा उचला.
कालचं आपण अल्लाहच्या अलौकिक अधभूत उत्साह मय वातावरणात ज्या क्षनाची वर्षेभर आतुरतेने वाट बघत असतो अश्या रामजानुल मुबारक रोज्याची आरंभी आपण सर्व जगातील सर्वासाठी प्राणी जगासाठी निरोगी सुखरूप आरोग्य लाभों व जगात सुख शांती लाभों याची अल्लाह कडे दुवा प्रार्थना करून संध्याकाळी लागलीच फक्त्त रमझान मधील अधिक विशेष पुण्य प्राप्तीच पर्व समजल्या जाणाऱ्या " तारविह "नमाज च्या तय्यारीला लागलो, दैनंदिनच्या ज्या पांच अनिवार्य( कॉम्पल्सरी ) वेळेच्या नमाज आहेत.
इस्लाम जे पांच महत्वाचं तत्व (फंडामेंतल प्रिन्सिपल) आहेत त्यामध्ये दुसरे महत्वाचं तत्व हें नमाज हें आपल्या हिंदी उर्दूत म्हणतात परुंतु पवित्र कुरआन मध्ये त्यालाच 'सलात " म्हणतात आपण त्याला प्रार्थना म्हणू या, प्रत्येक धर्मात उपासनेची भक्ती करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहेत, तशीच इस्लाम मध्ये नमाझ= नमाज, म्हणतात . आपण इंग्रजीत मेडिटेशन म्हणूया, परुंतु हें मेडिटेशन मेंदू पासून सर्व शरीराची हालचाल करायची आहेत, संपूर्ण मन एकाग्रता करून फक्त्त अल्लाह ( परमेश्वरा ) ची वंदना -बंदगी -मेडिटेशन सह व्यायाम करायचं आहेत, दिवसातून पांच वेळा..नमाजच्या वेळी आपल्या संपूर्ण शारीराची ठराविक पद्धतीने हालचाल करायची आहेत. नमाज नंतर " दुवा " प्रार्थना फक्त्त आपण स्वतः व अल्लाह यांचं नातं.. बस..
दैनंदिन म्हणजे रोज :- (1) फजर (भोर पहाटे )=( सूर्योदया अगोदर 20 मिनटं पर्यंत ) 5-30-ते 6-00 वाजेपर्यंत,(2) दुपारी जोहर 12-30-ते 3=00 वाजेपर्यंत, (3) असर ( गोरज मुहूर्त, संध्याकाळी ) 4-ते 6-0 ते -30 पर्यंत सूर्यास्ता पर्यंत, (4) मगरीब - अर्थात सूर्यास्ता नंतर लागेच (5) रात्री 8 = पासून ते रात्री उशिरा पर्यंत.
त्यानंतर ही अनेक ऐच्छिक( नफील )नमाजी आहेत.. काही बंधू त्या जरूर अदा करतात.असो.
प्रेषित मुहम्मद स्व. यांना अल्लाह ( परमेश्वरा ) नें आपल्या प्रेषितांच्या स्वर्ग ( जन्नत ) भेटीच्या दरम्यान "सलात " नमाज" अल्लाह नें बंदगी भक्ती साठीच भेट दिलेली आहेत. परुंतु या दिवस भराच्या अशा वेळी ठेवलेल्या आहेत की, या वेळी जगातील बहुतेक लोकं किंवा जग हें आळसलेल्या अवस्थेत किंवा काहीतरी मानसिक - शारीरिक थकवा तरी जाणवलेलं असतं किंवा सध्या च्या काळातील बाजारात फिरण्याच्या वेळा असतात, यालाच आपण निगेटिव्ह एनर्जी ची वेळा म्हणूच या, अल्लाह नें मानवानांना या वेळी स्पुर्ती - उत्साह यावं -ताजगी यावी व मनाला - शरीराला शांती भेटेल व स्पुर्ती चैतन्य वाटेल म्हणून कदाचित अल्लाहनें आपल्या वंदना साठीच या वेळेची अखनी केलेली असावी . असो.
त्या व्यतिरिक्त रमजान महिन्यातील स्पेसिअल खास तारविह नमाज, रात्री ईशा नमाज ला जोडूनच तास टिड तासाची 20 वीस रकात, संपूर्ण 30 दिवसात एक ते दोन वेळा पवित्र कुराअ ण म्हटलं जातं, तसं पहिले तर प्रत्येक नमाज मध्ये पवित्र कुरआ न पाठन करणं अनिवार्यच असतं परुंतु तारविह नमाज मध्ये रोज दीड ते दोन अध्याय ( para) च पाठन होतं.
पवित्र कुरआन हें प्रेषित ( पैगंबर ) मुहम्मद स्व. यांना अल्लाह नें हजरत जिब्राईल ( जिब्रोल्टर ) अलै.या आपल्या विशेष दुता मार्फत 23वर्षात आपल्या दैनंदिन काळानुरूप व गरजा नुसार समस्त जगाला एक मार्गदर्शक पवित्र ग्रंथ पाठवला, त्यामध्ये( 6666)सहा हजार सहासे साहशस्त आयती ( स्लोक, ओव्या ) 114 सुरह आहेत, 30 अध्याय ( पारा ) आहेत. त्यामध्ये मानवाच्या प्रत्येक गरजेनुसार गरजेसाठी मार्गदर्शक केलेलं आहेत. दीव्य कुरआन हें कायम वर्तमान व भविष्यात सुध्या वेळोवेळी मार्गदर्शक करेल, आधुनिक तांत्रिक युगात व भविष्यात घडणाऱ्या घटनांचे सुद्धा काळानुसार नूरूर्पण व मार्गदर्शन करेल. कविनी, साहित्यकानी अभ्यास केलेत की ते कोणत्याही अलंकारात यमक मध्ये फिट बसत, हजारो वेळी वाचलं की कायम काहीतरी नावं नवीनच शिकायला भेटते.
1456 वर्षात असंख्य वैद्यज्ञानिकानी प्रयोग संशोधन करून बघितलं परुंतु काळाच्या कसोट्यात पवित्र कुरआन कायम सिद्ध झाले आहेत. असो
हेच पवित्र कुरआ ण तील प्रत्येक आयतीच -स्लोक- शब्द न शब्द मोठमोठ्यांनी अलंकारिक पद्धतीने म्हटलं जातं त्यावेळी कानाला मानलं एक प्रकारचे सुखद वाटतेय.म्हणूनच काहीतरी वेगळं एकण्याचं आनंद भेटतोय. तेच मनाला स्पर्शसून जातात.
म्हणूनच प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " इतर वेळेपेक्षा रमजान मधील प्रत्येक गोष्टीच पुण्य इतर वेळे पेक्षा सत्तार पटीने जास्त भेटतात "
म्हणूनच या रमजानुल मुबारक क्षनांचा शब्द न शब्दाचा सबाब ( पुण्य ) तुम्हाला जरूर भेटेल.
सध्याच्या भाषेत ऑफर आहेत की एकाला सत्तर ची तर जरूर या पवित्र ऑफर ( संधी ) चा फायदा उचला.
( मित्रांनो लेख आवडल्यास माहिती साठी आपल्या मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा, आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ).
================≠================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना
मिल्लत नगर, श्रीरामपूर
जिल्हा :- अहमदनगर
मोबाईल :- 9271640014..
🌷🌷🌷🌷🌷👌👍🙏.
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment