राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, March 4, 2025

आईच्या मायेने शिकविणारे शिक्षक खरे शिल्पकार - डॉ. वंदना मुरकुटे


असबाक ट्रस्ट व समर् फाउंडेशन तर्फे शिक्षक पुरस्कारांचे वितरण; शिष्यवृत्ती व अधुरी तखलीक पुस्तकांचे प्रकाशन

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 मातृभाषा ही आईची भाषा असते आणि आईच्या मायेने शिकविणारे शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत. आज ज्या शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार म्हणून गौरव करण्यात आला त्यांचे कार्य ऐकल्यानंतर निश्चितपणे उर्दू शाळा मधून सुद्धा समाज निर्मितीसाठीचे बाळकडू दिले जातात हे आनंदाची बाब आहे. समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव होताना मनस्वी आनंद होतो असे प्रतिपादन पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले.
असबाक पब्लिकेशन पुणे, समर फाउंडेशन मालेगाव, मावा एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट अहमदाबाद व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना उर्दू सप्ताह निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर मुरकुटे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी समर्थ फाउंडेशन मालेगाव चे अध्यक्ष शिक्षण तज्ञ डॉ. अशफाक ऊमर हे होते.नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, सचिव आबीद खान, लेखक अजमत इकबाल, शाहीन शेख आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले की उर्दू भाषा मला फार कळत नसली तरी ती ऐकायला मात्र गोड असते आणि उर्दूची नजाकत ही माणसाला वेगळ्या विश्वात घेऊन जाते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशफाक उमर यांनी समर फाउंडेशन व मावा एज्युकेशन ट्रस्ट यांच्या कार्याचा परिचय यावेळी करून दिला.उर्दू माध्यमातील विद्यार्थी सुद्धा यूपीएससी व एमपीएससी मध्ये आले पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये मुस्लिम समाजाचे विद्यार्थी येण्यासाठी दोन्ही ट्रस्ट कार्यरत असून त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील मोहम्मद उमर बागवान (खासदार गोविंदराव आदिक ऊर्दू हायस्कूल श्रीरामपूर), अनिस मेहमूद शेख (मुख्याध्यापक जि प शाळा ममदापूर),सौ. नसरीन इनामदार (उपशिक्षिका, नगरपालिका शाळा क्रमांक ५,श्रीरामपूर),शेख जमीर अहमद याकूब (तंत्रस्नेही शिक्षक, जि प शाळा बेलापूर), हुसेनाबानो फारुक पटेल (पदवीधर शिक्षिका, जि प शाळा अशोक नगर), लेखिका महेरुन्निसा अब्दुल्लाह खान (उपशिक्षिका जि प शाळा राहाता), रुबीना ख्वाजा खान (उपशिक्षिका,जि प शाळा,शिरसगांव), मोमीन हुसेन बादशाह महमूद (मुख्याध्यापक जि प शाळा खर्डा,जामखेड),शेख आफरीन मोहम्मद (मुख्याध्यापिका, जि प शाळा समनापुर, संगमनेर) व शेख नाजेमाबेगम नवाब (उपशिक्षिका जि प शाळा सोनई,नेवासा) यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.सर्व पुरस्कार तीन सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले.परिषदेच्या सदस्या नर्गिस इनामदार, मोहम्मद उमर बागवान, अजमत इकबाल सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी अझमत इकबाल यांच्या अधुरी तखलीक व मेहरून्निसा खान यांनी लिहिलेल्या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा गाईड या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद बदर यांनी केले तर आभार इमाम सय्यद यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एजाज चौधरी,साजिद कुरेशी,राजे खान,हारुण अब्दुल्ला, एजाज शहा, मतीन मणियार, जुनेद शाह, अमरीन पठाण,महेवीश पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment