समर्थ कृषी महाविद्यालयात
दंत तपासणी शिबिर संपन्न
- सौ.किरणताई वाघ - देऊळगाव राजा -/ वार्ता -
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना एकक, देऊळगाव राजा व माई डेंटल क्लिनिक देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे दंत तपासणी करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी दात कसे घासावे, दाताची काळजी कशी घ्यावी,तरुण पिढी गुटखा - तंबाखू सारख्या सेवनांना बळी पडते त्यामुळे मुखाचा कर्करोग होऊ शकतो वेळीच दंतचिकित्सा केल्यामुळे लक्षात येऊन होणारे आजार टाळू शकतो तसेच व्यसन घातक ठरून जीवावर बेतू शकते याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच आरोग्य हाच खरा दागिना असून आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी करून घेतली पाहिजे, चांगल्या निरोगी सवयी आत्मसात केल्या पाहिजे याबद्दल डॉ. आशुतोष सोळंकी, माई डेंटल क्लिनिक, देऊळगाव राजा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिराला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण ठाकरे, रासेयो सह कार्यक्रम अधिकारी प्रा. अश्विनी जाधव, प्रा किशोर कवर व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार अजीजभाई शेख
राहाता
=================================
-----------------------------------------------
*वृत प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment