राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, April 8, 2025

भुईकोट किल्ल्याच्या विकासकामांत शिवछत्रपतींच्या वंशजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश करावा - आसिफ खान


- नगर -  प्रतिनिधी - वार्ता -
 गेल्या काही दिवस शहरातील वर्तमानपत्रात अहमदनगरच्या भुईकोट किल्ला विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला, असे वाचण्यात आले. त्यात नेताकक्ष व इतर काही विकासाची कामे करणार असे समजले.
अहमदनगरच्या भुईकोट किल्यात स्वराज्य महाराणी येसुबाई, छत्रपती संभाजी महाराजपुत्र छत्रपती शाहू हे, तर आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांचे वडील चौथे छत्रपती शिवाजी महाराज हे ब्रिटीशांनी कैदेत ठेवले होते. याच ठिकाणी चौथे शिवाजी महाराजांची हत्या झालेली आहे. या वास्तूंचासुध्दा विकासकामात समावेश झाला पाहिजे, अशी आग्रही मागणी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान यांनी केली आहे. 
शिवछत्रपतींच्या पाऊलखुणा पुसून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यामुळे संपूर्ण देशभरातून पर्यटक अहमदनगरला येतील. शिवरायांच्या वंशजांचा इतिहास जाज्वल्य आहे. आपण अहमदनगरकरांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याचा विचार करून विकासात्मक कामात या गोष्टींचा समावेश करावा, अशी मागणी अहमदनगर इतिहासप्रेमी मंडळाने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेकडे केली आहे. यावेळी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफखान दुलेखान, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, भैरवनाथ वाकळे आदि उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


No comments:

Post a Comment