राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, May 22, 2025

अगस्त्य व शौर्य या दोन्हीभावंडाची नेत्रदीप कामगिरअगस्त्याचा राष्ट्रीय स्तरावरील निवड झालेल्या प्रयोगास तृतीय क्रमांक

- देऊळगांव - राजा -/ प्रतिनिधी -
 पुणे येथील सेंटर स्कूल ऑफ नेचर सायन्सेस एस्ट्रो फिजिक्स विभागातील जीएमआरटी अर्थात जॉईंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात देऊळगाव राजा हायस्कूल चा विद्यार्थी अगस्त्य वैशाली बाळकृष्ण तिडके याचा हर्बल मॉस्किटो रिपेलेंट हा डासांवरील प्रतिबंधात्मक नैसर्गिक उपायांचा प्रयोग निवडला गेला होता. हा प्रयोग राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाने निवडला गेला आहे. यापूर्वी अगस्त चा प्रयोग राज्य विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आला होता. दिनांक २० मे २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात जीएमआरटीचे सेंटर डायरेक्टर प्राध्यापक यशवंत गुप्त व चेअर पर्सन दिव्या ओबेराय यांच्या हस्ते अगस्तला त्याच्या विशेष उल्लेखनीय प्रयोगासाठी आई वडील व शिक्षकासह प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी त्याचे विज्ञान मार्गदर्शक सुभाष तिडके सरांचा सत्कार करण्यात आला.

तिडके परिवारातील छोटे नवाब शौर्य वैशाली बाळकृष्ण तिडके यांनी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अंडर इलेव्हन वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला असून बुलढाणा जिल्हा चेस असोसिएशन तर्फे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी दिनांक १३,१४ व १५ जून रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने शौर्य जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. दिनांक २० रोजी बुलढाणा येथे झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून वेगवेगळ्या वयोगटातीलअनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात अकरा वर्षाखालील वयोगटात शौर्याने पाचही फेऱ्या जिंकून जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल बुलढाणा जिल्ह्याचे असोसिएशन तर्फे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन जिल्हाचे असोसिएशनचे अध्यक्ष सदस्य व पदाधिकाऱ्यांनी यांचा सन्मान केला. त्याच्या कामगिरीबद्दल रायजिंग चेस अकादमी देऊळगावराजा, त्याचे मार्गदर्शक सागर भाग्यवंत, शिक्षक व मित्र परिवाराकडून अगस्त्य व शौर्य या दोघांवरही उत्कृष्ट कामगिरी बद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार सौ.किरणताई वाघ✍️✅🇮🇳...
देऊळगांव राजा जि. बुलढाणा 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment