राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, May 23, 2025

*राज्यात बारावी (HSC) परीक्षेत**मराठी विषयात मुलींची बाजी*


*राज्यात बारावी (HSC) परीक्षेत*
*मराठी विषयात मुलींची बाजी*

(बारावी एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत नऊ 
विभागात मराठी विषयात मुलीच प्रथम)

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
एच. एस. सी. बोर्ड परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून राज्यात एच. एस. सी. बोर्ड परीक्षेच्या नऊ विभागात मराठी विषयात मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याची माहिती राज्याचे मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील डिसले यांनी दिली. 
राज्यात एच.एस.सी. बोर्ड परीक्षेचा २०२५ चा निकाल लागल्यानंतर नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार राज्यात नऊ विभागीय बोर्डामध्ये मराठी विषयात मुलींनी बाजी मारली आहे. यामध्ये मुंबई विभागात रामनिरंजन झुनझुनवाला कनिष्ठ महाविद्यालय, मुंबई येथील विद्यार्थिनी गायत्री दीपक पन्हाळकर ही विद्यार्थिनी मराठी विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून प्रथम आली आहे. या विद्यार्थिनीस मार्गदर्शक शिक्षक प्रा. दीपा ठाणेकर, मुंबई यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे विभागात ज्ञानगंगा कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणे येथील संहिता केशव पोतदार ९९ गुण मिळवून प्रथम आली आहे. या विद्यार्थिनीस वैशाली जामकर, हिंगणे यांचे मार्गदर्शन लाभले. अमरावती विभागात एडेड कनिष्ठ महाविद्यालय, बुलढाणा येथील गायत्री अरविंद भोकरे ९८ % गुण मिळवून प्रथम आली आहे. या विद्यार्थिनीस सखाराम जोशी व डॉ. योगेश दिवाने, बुलढाणा यांचे मार्गदर्शन लाभले. छत्रपती संभाजीनगर विभागात कै. दादासाहेब पाटील जुनिअर कॉलेज, दहेगाव येथील साक्षी सुनील धनवटे ९७ % गुण मिळवून प्रथम आली आहे. या विद्यार्थिनीस जी.पी. सोनवणे, दहेगाव यांचे मार्गदर्शन लाभले. कोल्हापूर विभागात छत्रपती शिवाजी जुनिअर कॉलेज, परळी येथील सावली संतोष जानकर ९७ % गुण मिळवून प्रथम आली. या विद्यार्थिनीस वैशाली पवार, परळी यांचे मार्गदर्शन लाभले. नागपूर विभागात बी.आर. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, हिंगणघाट येथील राखी राजेश राठोर ९६% गुण मिळवून प्रथम आली. या विद्यार्थिनीस विद्या खेळकर, हिंगणघाट यांचे मार्गदर्शन लाभले. लातूर विभागात ज्ञानप्रसार उच्च माध्यमिक विद्यालय, मोहा येथील मुक्ता अशोक वाघ ९६% गुण मिळवून प्रथम आली. या विद्यार्थिनीस राहुल भिसे, मोहा यांचे मार्गदर्शन लाभले. कोकण विभागात मुरारी तथा भाई मयेकर जुनिअर कॉलेज, मालगुंड येथील गौरीशंकर नेवरेकर ९६ % गुण मिळवून प्रथम आली आहे. या विद्यार्थिनीस अमित जाधव, मालगुंड यांचे मार्गदर्शन लाभले. 
 या यशस्वी विद्यार्थिनींचे राज्य मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील डिसले (बारामती), कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे (अहिल्यानगर), कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे (वर्धा), सचिव बाळासाहेब माने (मुंबई), डॉ. शरद दुधाट, जिल्हाध्यक्ष (अहिल्यानगर) यासह महासंघाचे सर्व पदाधिकारी, राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष तसेच मराठी विषय शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment