राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, June 1, 2025

अहमदनगर शहर स्थापना दिनानिमित्त ठाकूरदास परदेसी यांचे गडकिल्ले चित्र प्रदर्शन संपन्न


महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांचा इतिहास व सौंदर्य ठाकूरदास परदेसी यांनी चित्रातून मांडला - डॉ. कमर सुरुर 

अ,नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
गड किल्ल्यांचा संपूर्ण देशाला मोठा इतिहास आहे. जुने तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी राजे महाराजे यांनी बांधलेले महाल किल्ले एक उत्तम साधन आहे. आज एवढे तंत्रज्ञान असून सुद्धा जुन्या काळातील तो टिकाऊपणा व सौंदर्य नवीन वास्तूंना येत नाही. उलट नवीन पिढी सुद्धा जुन्या वास्तूंचा सुंदरपणा आपल्या नवीन वास्तूमध्ये आणण्याचा प्रयत्न करतात. अशा या वास्तूंची भ्रमंती करून ठाकूरदास परदेसी यांनी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा सौंदर्य आपल्या कॅमेरयात कैद करून तो चित्राच्या रूपाने आपल्यासमोर मांडला आहे. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर यांनी केले.
मख़दुम सोसायटी, रहमत सुलतान फाउंडेशन व अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने अहमदनगर शहराचे ५३५ व्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील दोनशे पेक्षा जास्त गड किल्ल्यांची भ्रमंती करणारे ठाकूरदास परदेसी यांच्या चित्रांचे प्रदर्शन अहमदनगर शहरातील सर्जेपुरा येथील रहमत सुलतान सभागृहात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. कमर सुरुर, बोलत होत्या यावेळी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान,संध्याताई मेढे, क्वाईन संग्रहक सचिन डागा, पंकज मेहेर, डॉ. परवेज अशरफी, मुस्कान असोसिएशनचे शफकत सय्यद, फिरोज शेख, आर्किटेक फिरोज शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ कमर सुरुर म्हणाले की असे प्रदर्शन नेहमी आयोजित होणे गरजेचे आहे. यामुळे नवीन पिढीला आपला इतिहास जाणून घ्यायची संधी मिळते. व ज्यांनी प्रत्यक्ष गड किल्ले बघितले नाहीत ते या चित्रांचे माध्यमातून व त्यांच्या संग्रहका कडून बरीच माहिती मिळवता येते असे सांगितले. 
चित्र प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला. लोकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद खान यांनी केले. तर आभार शफकत सय्यद यांनी मांनले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment