जिल्ह्यात चौदा केंद्रावर २१४३
प्रशिक्षणार्थींचे नियोजन
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र शासन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर (अहिल्यानगर) आणि जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील २१४३ शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे अनिवासी प्रशिक्षण २ ते १२ जून २०२५ या कालावधीत सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. राज्यात हे प्रशिक्षण सर्व केंद्रांवर एकाच वेळी पार पडत आहे.
अहिल्यानगर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथील प्राचार्य डॉ. राजेश बनकर व अरुण भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. वरिष्ठ अधिव्याख्याता अरुण भांगरे हे या प्रशिक्षणाचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थींची मोठी संख्या आणि विविध शिक्षक संघटनेच्या मागणी व विनंतीनुसार राज्यात व अहिल्यानगर जिल्ह्यात तालुकास्तरावर हे प्रशिक्षण पार पडणार आहे. पारनेर येथील न्यू इंग्लिश स्कूल, सुपा या तीन वर्गसंख्या व ११९ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर वरिष्ठ अधिव्याख्याता लक्ष्मण सुपे समन्वयक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
अकोले येथील अगस्ती महाविद्यालय या चार वर्गसंख्या व १५९ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर वरिष्ठ अधिव्याख्याता समन्वयक अधिकारी म्हणून अरुण भांगरे, कोपरगांव येथील आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण या तीन वर्गसंख्या व १२६ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर अधिव्याख्याता समन्वयक अधिकारी म्हणून डॉ. कैलास सदगीर, संगमनेर येथील अमृतवाहिनी निडो स्कूल या दोन वर्गसंख्या व २७० प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर अधिव्याख्याता समन्वयक अधिकारी म्हणून श्रीमती ज्योती निंबाळकर, अहिल्यानगर येथील श्री संतुकनाथ विद्यालय, जेऊर या पाच वर्गसंख्या व २२२ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर विस्ताराधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून संजय बोबडे, पाथर्डी येथील श्री त्रिलोक जैन विद्यालय या तीन वर्गसंख्या व १३६ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर अधिव्याख्याता समन्वयक अधिकारी म्हणून रामेश्वर लोटके, जामखेड येथील ल. ना. होशिंग विद्यालय या दोन वर्गसंख्या व ६९ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर विस्ताराधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून जालिंदर खताळ, श्रीगोंदा येथील श्री. कोळाईदेवी विद्यालय, कोळगांव या तीन वर्गसंख्या व १४९ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर विस्ताराधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून भाऊसाहेब शिर्के, कर्जत येथील श्री समर्थ विद्यालय, कर्जत या दोन वर्गसंख्या व ९३ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर समन्वयक अधिकारी म्हणून श्रीमती सुरेखा ठुबे, शेवगांव येथील त्रिमूर्ती घाडगे पाटील माध्यमिक विद्यालय, शेवगांव या दोन वर्गसंख्या व १२२ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर अधिव्याख्याता समन्वयक अधिकारी म्हणून मुकुंद दहिफळे, राहुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ या तीन वर्गसंख्या व १४५ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर समन्वयक अधिकारी म्हणून श्रीमती सुमन सातपुते, नेवासा येथील त्रिमूर्ती माध्यमिक घाडगे पाटील विद्यालय, नेवासा फाटा या चार वर्गसंख्या व २११ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर गटशिक्षणाधिकारी समन्वयक अधिकारी म्हणून शिवाजी कराड, राहाता येथील कला, वाणिज्य महाविद्यालय या चार वर्गसंख्या व १५५ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर अधिव्याख्याता समन्वयक अधिकारी म्हणून डॉ. गणेश मोरे, श्रीरामपूर येथील आर. बी. एन. बी. कॉलेज या दोन वर्गसंख्या व १२५ प्रशिक्षणार्थी असलेल्या केंद्रावर समन्वयक अधिकारी म्हणून श्रीमती संजीवनी अंबिलवादे या काम पाहणार आहेत.
प्रशिक्षकांना प्रत्येक तासिकेनंतर १० गुणांची चाचणी महत्वाची असून प्रत्येक तासाला ऑफलाईन व ऑनलाईन हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. नियमित प्रशिक्षणासोबत कला व क्रीडा शिक्षकांचे सात दिवसांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण २ ते ९ जून २०२५ या कालावधीत तर १० ते १२ जून २०२५ या तीन दिवसांचे प्रशिक्षण विभाग स्तरावर होणार आहे. प्रशिक्षणार्थींनी आपल्या सोबत ऑनलाईन चाचणी देण्यासाठी मोबाईल, फुलस्केप कागद, वही, विषयांची पाठ्यपुस्तके व प्रश्नपत्रिका ठेवाव्यात. प्रशिक्षणाच्या शेवटी लेखी चाचणीचे नियोजन करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना पाच स्वाध्याय, प्रकल्प, कृती संशोधन, नवोपक्रम अहवाल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ४० दिवसात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर येथे विहित मुदतीत जमा करावी लागणार आहेत. प्रशिक्षणार्थी गैरहजर राहिल्यास अथवा निकषानुसार मूल्यमापनामध्ये उत्तीर्ण न झाल्यास प्रमाणपत्र मिळणार नाही असे सूचित केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ. शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment