विद्यार्थ्यांनी सैनिकांबद्दल आदरभाव
ठेवला पाहिजे - मसाजिस्ट फरीद बापू
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सिमेवरील जवान देशाच्या संरक्षणासाठी आपली जीवाची बाजी लावत आहेत. अनेक युद्धात आपल्या सैनिकांनी शत्रूंना पराजयाची धूळ चारली आहे. त्यापैकीच कारगील युद्ध एक होय.
या युद्धात शहिद झालेल्या जवानांप्रती आदरभाव प्रत्येकाने व्यक्त केला पाहिजे. हीच जाणिव ठेवून मखदुम सोसायटीच्यावतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन सैनिकांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
अशा उपक्रमातूनच आपण देशाचे एक जागरुक नागरिक म्हणून पुढे यावे, असे आवाहन प्रसिद्ध मालिश तज्ञ फरीद बापू यांनी केले.
मखदुम सोसायटी व रेहमत सुलतान फौंडेशनच्यावतीने नगर शहरातील तपोवन रोड येथील अनाथ व निराधार बालकांचे बालघर प्रकल्प मधील विद्यार्थ्यांना वह्या वितरण करण्यात आल्या. याप्रसंगी प्रसिद्ध मसाजिस्ट फरीद बापु, मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, सचिव डॉ. कमर सुरुर, बालघर प्रकल्पचे युवराज गुंड आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना फरीद बापू म्हणाले की, समाजात काम करणार्या संस्थांनी फक्त शालेय मदत न करता या विद्यार्थ्यांसाठी इतर शैक्षणिक कार्यक्रमही आयोजित करण्याची नितांत आवश्यकता तथा गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसचांलन आबीद खान यांनी केले. प्रास्तविक डॉ. कमर सुरुर यांनी केले. तर आभार युवराज गुंड यांनी मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳....
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment