प्रिय मराठी बांधवांनो आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या परप्रांतीय बांधवांनो, महाराष्ट्र सैनिक हा कधीच गुंड प्रवृत्तीचा नाही, हे लक्षात घ्या! जिथे अन्याय दिसेल, तिथे लाथ मारलीच पाहिजे, असा स्पष्ट संदेश स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच दिला आहे. आम्ही अन्यायाविरुद्ध लढतो, लोकांच्या न्याय हक्कासाठी झटतो! लोक आपल्या तक्रारी घेऊन शिवतीर्थावर येतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात येतात. आम्ही प्रत्येक बाजू समजून घेतो, मगच कृती करतो. आमची प्रतिक्रिया ही नेहमीच विचारपूर्वक आणि न्यायासाठी असते. त्यामुळे आम्हाला गुंड समजू नका ! आम्ही प्रथम हात जोडतो, निवेदन देतो, आणि मगच प्रशासनाला जागं करण्यासाठी हाक मारतो ! सत्ता नसतानाही आम्ही लोकांची कामं करतो. सत्ता देऊन तर पाहा, आम्ही कुणालाही तक्रार करण्याची वेळ येऊ देणार नाही, हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र सैनिक ठामपणे सांगतो !
=================================
-----------------------------------------------
जय हिंद !
जय महाराष्ट्र !
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment