- कच्छभुज - प्रतिनिधी -/ वार्ता -
गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या आशापुरा मातास्थळी नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षी लाखो भाविक पायी पायी दर्शनासाठी हजेरी लावतात. या भाविक भक्तांसाठी धनलक्ष्मीबेन नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या वतीने मागील २६ वर्षांपासून अन्नछत्र सुरू असून, यंदाही या परंपरेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झाला.
या अन्नछत्राच्या प्रारंभ प्रसंगी लोकसभा खासदार विनोद चावडा, जिल्हाधिकारी महेंद्रभाई पटेल, त्रिकामदासजी महाराज, नामवंत उद्योजक नानजीभाई ठक्कर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे, माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे, एन.के.टी. ट्रस्ट संस्थेचे सचिव नटवरलाल ठक्कर (ठाणे), अंजार बाजार समितीचे उपाध्यक्ष महेशभाई ठक्कर, भरतभाई ठक्कर, प्रभुभाई ठक्कर, मनोहरसिंह जाडीयाबचाव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी नानजीभाई ठक्कर यांनी सांगितले की, “आशापुरा माता ही केवळ कच्छ भागातील नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाची आराध्य दैवत आहे. लाखो भक्त पायी प्रवास करत या ठिकाणी येतात. अशा भाविकांसाठी २६ वर्षांपासून आम्ही अन्नछत्राची सेवा करीत आहोत. ही सेवा करताना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, मात्र या मातीचा आशीर्वाद आणि भक्तांचा प्रेम मिळणे हाच आमचा खरा अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आमच्या परिवाराबरोबरच मित्रपरिवारानेही या सेवेला हातभार लावला असून, हे कार्य पुढेही अखंड सुरू राहील. आज नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या रूपाने हिंदुस्थानाला एक सामाजिक रत्न मिळाले आहे, याचा अभिमान सर्व गुजरातवासीयांना वाटतो.”
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन कच्छ येथील पत्रकार कौशिक छाया यांनी केले. सर्व पत्रकार व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करताना ठक्कर कुटुंबीयांनी विशेषत: धनलक्ष्मीबेन ठक्कर यांचे योगदान अधोरेखित केले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment