गेल्या पंधरा दिवसांपासून ऑन ड्यूटी असताना बेपत्ता झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ काशिनाथ फापाळे यांच्या शोधासाठी आज नवी मुंबई येथील सीपी ऑफिसवर लिंगदेव ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चादरम्यान नवी मुंबईचे पोलीस आयुक्त कांबळे साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच सोमनाथचा शोध घेतला जाईल, असे आश्वासन पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना दिले.
मोर्चामध्ये सुमारे हजार ते बाराशे नागरिक सहभागी झाले होते. या वेळी पोलीस दलात कार्यरत असूनही सोमनाथ गेल्या १५ दिवसांपासून बेपत्ता आहेत, याकडे दुर्लक्ष होत असल्याचा सणसणीत आरोप नातेवाईकांनी केला. पोलीसांकडे अनेक धागेदोरे उपलब्ध असूनही शोध लावण्यात विलंब का होत आहे, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
सोमनाथ फापाळे यांचे आई-वडील, पत्नी वैशालीताई, चुलते तसेच नातेवाईकांनी संतप्त स्वरात सांगितले की –
> "चार दिवसांत सोमनाथचा शोध लागला नाही, तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही."
यामुळे ग्रामस्थांचा आक्रोश अधिकच तीव्र झाला. ‘जर पोलीस दलातील जवान सुरक्षित नसतील, तर सामान्य जनतेचे रक्षण कोण करणार?’ असा सवाल यावेळी संतप्त मराठा समाजाने केला.
मोर्चामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रभाकर फापाळे, लिंगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष डी. बी. फापाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाऊसाहेब हाडवळे, संदीप शेणकर, हरिभाऊ फापाळे, मराठी क्रांती मोर्चाचे नवी मुंबई नेते विनोद पोखरकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मारुती खुटवड, युवक नेते जीवन पाडेकर, रामनाथ दवंगे, नितीन भांगरे, गोरख मिंडे, युवक नेते सौरभ पानसरे, लिंगदेव सरपंच अमोल फापाळे, अमित घोमल, अरुण फापाळे, जानकीराम हाडवळे, ऋषी कानवडे, शिवसेना युवा नेते पोपट नाईकवाडी, अशोक फापाळे, जालिंदर कानवडे, लहानु फापाळे, खंडू काळभोर, यमाजी कानवडे, राजेंद्र फापाळे, अशोक कानवडे, चित्रा काळभोर, सुदाम हांडे, बाळासाहेब कानवडे, सोमनाथ कानवडे, सोमनाथ हांडे, रोहिदास कानवडे यांसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
कुटुंबीय व ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला की –
> "जर आमच्या मुलाला सापडून दिले नाही, तर आम्ही राज्य सरकारकडे थेट जाऊ. दोषींना सोडले जाणार नाही. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे पोलीसांचे ब्रीदवाक्य असताना पोलीसच जर पोलीसांचे संरक्षण करीत नसतील, तर सर्वसामान्यांचे रक्षण कसे होणार?"
या मोर्चामुळे पोलीस दलासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून सोमनाथ फापाळे यांचा शोध लावण्यासाठी आता प्रशासनावर जबरदस्त दबाव निर्माण झाला आहे.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment