राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, September 18, 2025

आहो कोणी तरी ग्राम महसुल**(तलाठी) अधिकाऱ्यांना कळवा !!**म्हणावा किमान मुरुमाचा तरी**एखाद्या ढंपर इकडेही वळवा !!*


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र चिखलमय परिसर झाल्याचे दृष्टीपथास येत आहे,त्यात एखाद्या शासकीय कार्यालयासमोर जर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या - जाणाऱ्या नागरीकांना किती त्रास सहन करणे भाग पडू शकते याचे ताजे उदाहरण जर कोणास बघावयाचे असल्यास त्यांनी श्रीरामपूर येथील कर्मवीर चौक याठिकाणी असलेले ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) कार्यालयात समक्ष येवून बघावे.
याठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या - जाणाऱ्यांना चिखलालुनच आपला मार्ग क्रमण करावा लागत आहे,
यामध्ये महिला,वयोवृद्ध ते शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी तथा समस्त नागरीक नेहमीच आपल्या कामानिमित्त याठिकाणी येतात आणी चिखल तुडवत ग्राम महसुल अधिकारी (तलाठी) कार्यालय अक्षरशः जीव मुठीत घेवून कसे बसे गाठवतात, कित्येक पादचारी आणी दुचाकी स्वार तर नेहमीच या चिखलात घसरुन पडत असल्याचे देखील अनंत उदाहरणे आहेत. 
या कार्यालयाचे आणखी एक विशेष महत्त्व असेही आहे ते असे की, या ठिकाणी वाहने देखील चिखरातच पार्क करावी लागते हे विशेष.
या कार्यालया इतकी इतर कोणत्याही शासकीय कार्यालयास प्रशस्त जागा नाही,परंतु प्रचंड चिखलाच्या साम्रज्यात आडकलेल्या या कार्यालयाची कधी चिखली दुर होवून नागरीकांचा त्रास देखील नाहीसा होईल ? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.
महसुल खात्याकडून एरव्ही बहूदा किती तरी वेळा अवैध मुरुम वाहतूक करणारी वाहने पकडली जातात, त्यातील मुरुम (गौण खणीज) जप्तही केले जाते, मग नेमके त्याचे पुढे काय होते ? हे जरी आजवर कुणास कळले नसावे परंतु त्यातील एखादा तरी मुरुमाचा ढंपर याठिकाणी उतरविल्यास सध्याची ही परिस्थिती कायमची बदलु शकते परंतु त्यासाठी तशी मानसिकता देखील हवी असल्याचे नागरीकांतुन बोलले जात आहे. करीता
*"आहो कोणी तरी ग्राम महसुल (तलाठी) अधिकाऱ्यांना कळवा,* *म्हणावा किमान मुरुमाचा तरी*
*एखाद्या ढंपर इकडेही वळवा"* 
असे म्हणणे तरी कुठे वावगे ठरु शकणार ?.

No comments:

Post a Comment