राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, October 4, 2025

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास नगर जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा


ना.अजीतदादा पवार यांच्याकडे 
राम रहीम प्रतिष्ठानची मागणी 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार नगर जिल्ह्यातील पारनेर दौऱ्यावर आले असताना राम - रहीम बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख (मेजर) यांनी त्यांची भेट घेऊन मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास अहमदनगर जिल्ह्याकरीता निधी उपलब्ध करून द्यावा मागणी केली. 
यावेळी पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. जिल्हा परिषद सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे, दिलीप दाते, नियाज राजे, रियाज राजे, किरण कुबडे, इमरान शेख, आवेज राजे, रेहान राजे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी उपलब्ध करून देतो, माझ्याकडून व्यत्यय उशिर होणार नाही असे लगेच आदेशच दिला. 
प्रत्येक समाजाच्या कामासाठी तळमळीने, जात धर्माच्या पलिकडे जाऊन समाजसेवा व मानवता हाच खरा धर्म माणुन काम करणारे व झटणारे असे समाजसेवक माजी सैनिक रफिक शेख (मेजर) यांनी अजीत पवार यांना निवेदन देऊन माहिती दिली की, सैनिकांना सन १९७१ मध्ये सिलीगची जागा वाटप झाली होती. त्या जागेला ५५ वर्षे झाली तरी ताबा माजी सैनिकांचा नाही. त्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमणे केलेली आहेत. दादांनी जिल्हाधिकारी यांना आमच्या समोरच हे काम तात्काळ करून द्या असा आदेश दिला असल्याचे राम रहीम सामाजिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष रफीक मेजर यांनी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment