राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, October 7, 2025

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोणी दौर्‍यावर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ


- लोणी - प्रतिनिधी -/ वार्ता -

द्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी सहकार पंढरी सज्ज झाली असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवाराने जय्यत तयारी केली होती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आणि लोणी बुद्रूक गावातील ग्रामस्थांनी उभारलेल्या पद्म स्मृती या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी लोणी गावही भगवेमय झाले आहे.

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह दुसर्‍यांदा लोणीमध्ये यआले होते असून यापूर्वी सहकार परिषदेच्या निमित्ताने त्यांचे सहकार पंढरीत आगमन झाले होते. मंत्री विखे पाटील यांनी बाजारतळावर उभारलेल्या भव्य सभा मंडपाची पाहणी करून, तयारीचा आढावा घेतला. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना तसेच पद्म स्मृतीस्थळ आणि सभास्थळाचे भव्य नियोजन करण्यात आले होते आज रविवारी सकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह साईबाबा मंदिरात दर्शन घेऊन पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर गेले होते आहेत. कारखान्याच्या नूतन प्रकल्पाचा शुभारंभ करून ते लोणी बुद्रूक गावामध्ये येतील. बसस्थानकाजवळील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून समोरच उभारलेल्या सभास्थळी पोहोचले होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या कार्यक्रमला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

कोपरगाव :- साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून उसाच्या टाकाऊ पदार्थांपासून सीएनजी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरू झाली आहे. कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे, जिथे ऊस प्रक्रियेतील वाया जाणार्‍या पदार्थांपासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस (सीएनजी) व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युल निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व शेतकरी सहकार मेळाव्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह ययेऊन गेले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित होते


=================================

-----------------------------------------------

:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...

Mobile +919730595775...

-----------------------------------------------

=================================


No comments:

Post a Comment