संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने संगमनेर शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना याबाबत संवाद साधला. यावेळी महायुतीने जाहीर केलेल्या वचननाम्यातील सर्व आश्वासने वेळेत आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची ग्वाही नागरिकांना दिली.
यासोबतच अनेक नागरिकांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे मनापासून स्वागत करून त्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय कार्यपद्धतीमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, शहरातील घरकुल योजना, युवकांसाठी उपलब्ध रोजगार संधी, आरोग्य सुविधा याबाबत महायुती सरकारने केलेल्या कार्यवाहीची तसेच आगामी नियोजनाची माहिती नागरिकांना दिली.
संगमनेरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच सक्षम पर्याय आहे, आणि त्यासाठी सर्वांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन या भेटीदरम्यान नागरिकांना करण्यात आले.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment