- मुंबई - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्राने मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलव्यवस्थापन क्षेत्रात पुन्हा एकदा देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या ६व्या राष्ट्रीय जल पुरस्कारात राज्य श्रेणीत महाराष्ट्राला बहाल झालेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महामहीम राष्ट्रपती मा. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते स्विकारण्यात आला. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री मा.श्री. सी. आर. पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री. दिपक कपूर उपस्थित होते.
मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील जलसंपदा विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने घेतली आहे. राज्यात जलसंवर्धन, धरण सुरक्षा, सिंचन प्रकल्प आणि पाणी पुनर्वापर यांसारख्या महत्वाच्या उपक्रमांना मोठी गती मिळाली आहे.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या 'जलसमृद्ध भारत' या संकल्पनेला महाराष्ट्राने प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवले आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रभावी नेतृत्वाला आणि महायुती सरकारच्या सामूहिक प्रयत्नांना जाते. हा पुरस्कार दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या संकल्पनेला मिळालेला बळकटीकारक टप्पा आहे.
धन्यवाद, महायुती सरकार !
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment