राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 21, 2025

टिपू सुलतान फाऊंडेशन तर्फे नंदुरबार शहरात ह.टिपू सुल्तान जयंती साजरी


- नंदुरबार -  प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील शहिद टिपू सुलतान फाऊंडेशन तर्फे नंदुरबार शहरात हजरत शहिद टिपू सुल्तान यांची २७५ वी जयंती विविध सामाजाभिमुख उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

येथील पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालय याठिकाणी शहिद टिपू सुलतान फाऊंडेशन च्यावतीने थोर स्वतंत्र सेनानी, महायोद्धा,शेर ए म्हैसूर ह.फतेहअली उर्फ हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या २७५ व्या जयंतीनिमित्त विविध सामाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाजभाई बागवान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून धर्मगुरु हाफीज आबीद बागवान, प्रा.फारुख खाटीक, सामाजिक कार्यकर्ते बाबु ठेकेदार, रहेमान मोमीन, सत्यनारायण शर्मा, हिरालाल चौधरी, रामकृष्ण मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ह. शहीद टिपू सुलतान यांच्या तैलचित्राला अभिवादनाने करण्यात आली. यावेळी मदरसा मधील सर्व विद्यार्थ्यांनी पवित्र कुराण पठण करुन ह.शहीद टिपू सुलतान यांच्यासाठी फातेहा खॉनी करुन दुआ केली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले तसेच पंच मंडळ पीर महंमद नाथानी वाचनालयास ह.शहीद टिपू सुलतान यांच्या कार्याविषयी माहिती असलेली माहिती पुस्तिका वाचण्यासाठी देण्यात आली.
यावेळी धर्मगुरु हाफीज आबीद बागवान म्हणाले की, फतेहअली उर्फ ह.शहीद टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन व सोने - चांदी दान दिले होते. १० हजार सोन्यांची नाणी मंदिराला दान दिले होते. अशा दानशूर व्यक्तीमत्व असलेल्या ह.टिपु सुलतान यांच्या कार्याचा आदर्श घेत त्यांच्या सामाजहितैशी मार्गावर सर्वांनी चालले पाहीजे. 
सर्व थोर महापुरुषांची आठवण ठेवून सर्वांनी त्यांच्या कार्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल फिरोज काजी यांनी केले. तर आभार सद्दाम मोमीन यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाला बागवान, असलम कुरेशी, सलीम बागवान, आरीफ मोमीन, जाकीर शाह आदींनी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment