समिंद्रा फाऊंडेशनतर्फे शंभूक
वसतिगृहात दिवाळी फराळ
- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सामाजिक विषमतेचे चटके सोसूनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून परिश्रमाच्या जोरावर अलौकिक कार्याद्वारे जगभरात स्वतः ची ओळख निर्माण करणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थ्यांसह समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी केले.
श्रीरामपूर येथील शंभूक विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना उक्कलगांव (ता. श्रीरामपूर) येथील सदाशिव थोरात यांच्या समिंद्रा फाऊंडेशनच्या पुणे शाखेतर्फे दिवाळी फराळ व इतर साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी साळवे बोलत होते.
राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त बबनराव तागड, सेवानिवृत्त शिक्षक रभाजी कोळगे, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सलीम शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री डॉ.अबूल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तसेच रभाजी कोळगे यांच्या जन्म दिनानिमित्त त्यांना विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, असा मंत्र दिला. त्यानुसार मार्गक्रमणा करून विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी बनावे असेही मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले.
बबनराव तागड व रभाजी कोळगे यांनी वसतिगृहाचे प्रमुख अशोक दिवे व समिंद्रा फाऊंडेशनचे सदाशिव थोरात यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
तालुक्यातील उक्कलगाव येथील भूमिपुत्र असलेले सदाशिव थोरात यांनी आपल्या आई समिंद्रा यांच्या नावाने सुरू केलेल्या फाऊंडेशनच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ व दैनंदिन वापरातील साहित्य वाटप करण्यात आले.
वसतिगृहाचे प्रमुख अशोक दिवे यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धार्थ दिवे यांनी आभार मानले.
========================≠========
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
========================≠========
No comments:
Post a Comment