राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, January 23, 2023


( नरोत्तम चव्हाण - जेष्ठ पत्रकार )

*यह है मेरे देश की धरती जहां सोना उगले और एक ही जी.आर.ऐसा बनाएं जिसमें सन् 1947 से 2023 तक के *बाल्मीकि मेहतर अंतर्गत आदि सफाई कामगार  तथा उनके आश्रितो के सभी जन्म से लेकर मृत्यु तक के सभी फायदे जो हमारे पूर्वजों ने हमारे लिए बनाए हैं उसका समावेश तो होना ही चाहिए बल्कि इसमें अधिक मात्रा में कुछ डाल कर इसकी *अंमलबजाओ नी हो, अंमलबजाओ जी न करने वाले शासन मे बैठे हुए अधिकारियों को दंडित किया जाए और हजारों करोड़ों भविष्य में आने वाली पीढ़ियों को सुजलाम सुफलाम बनाया जाए यही *स्वतंत्र दिन 26 जनवरी 2023 से घोषित किया जाय यही सभी सफाई कामगारों का वर्ग अपेक्षा करता है धन्यवाद!* 💐🙏 ♥️ 🇮🇳


 
*नरोत्तम चव्हाण (समाज भूषण )*
*एडवोकेट कबीर बिवाल (समाज हितैषी )*

नासिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात काही दिवसांपूवी आदिवासी कातकरी मुलाची विक्री करून वेटबिगारी प्रकार संधर्भात केंद्रीय अनुसूचित जमाती आयोग मार्फत. ताऱखीलास हजर ना राहिल्यास जिल्हा अधिकारी व पोलीस अधिक्षक यांना वॉरंट ?


( नासिक ) वार्ता. नासिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात  काही दिवसांपूवी आदिवासी कातकरी समाजातील अल्पवयीन मुलांची काही हजार रुपयात विक्री करून वेठबिगारीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिवाळी अधिवेशनात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार छगन भुजबळ  यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.
त्यावेळी भुजबळ म्हणाले होते की, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर व पारनेर तालुक्यातील सहा बालकांना एक मेंढी व दोन हजार रुपयात विकत घेवून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांच्याकडून मजुरी करून घेतली. सदर वेठबिगारी प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झालेले आहे. मात्र बेपत्ता मुलांचा आणि फरार आरोपींचा शोध घेण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडून दिरंगाई व टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता अल्पवयीन मुलांच्या वेठबिगारी प्रकरणात केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाने नाशिक आणि अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांना साक्षीदार म्हणून हजर न राहिल्याने वॉरंट काढले आहे.
त्यानुसार नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी, अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला या चारही अधिकाऱ्यांना २ जानेवारी २०२३ रोजी आयोगाने समन्स बजावला होता. त्यानंतर ९ जानेवारी रोजी चौघांनी साक्षीदार म्हणून या प्रकरणातील अहवाल सादर करून आयोगासमोर हजर राहणे अपेक्षित होते, मात्र तसे न झाल्याने आयोगाने थेट पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यानुसार १ फेब्रुवारीपर्यंत महासंचालकांतर्फे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.काय प्रकरण काय आहे 
इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावात आदिवासी कातकरी समाजातील कुटुंबाला पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या मुलांची विक्री झाल्याची घटना समोर आली होती. त्यापैकी एका मुलीचा खून झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. तर काही पीडित मुला-मुलींनी दिलेल्या जबाबानुसार संगमनेर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. त्यातील एक गुन्हा पारनेर पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक व अहमदनगरमध्ये पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणांमध्ये संशयितांना अटकही झाली, मात्र त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरु असतांना संबधित अधिकाऱ्यांनी हजर राहणे अपेक्षित असतांना अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दर्शविल्याने राष्ट्रीय अनुसूचित आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना वॉरंट जारी करत त्यांची चांगलीच कानउघडा केली आहे 

Sunday, January 22, 2023

आ. तांबें मुळे थोरात हेही अडचणी असं ना.छगन भुजबळ पदवीधर निवडणूक संदर्भात खंत व्यक्त ?

( नाशिक : समाचार एजन्सी )
पदवीधर निवडणुकीत आमदार तांबे यांनी एबी फॉर्म असूनही अर्ज न भरल्याने काँग्रेस पक्ष अडचणीत आल्याची खंत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. तांबे यांच्याबद्दल लोकांचे मत चांगले असताना त्यांच्या कृतीमुळे माजी मंत्री बाळासाहेब थोरात हेही अडचणीत सापडल्याचे ते म्हणाले. ओबीसी आरक्षण राजकीय मुद्दा नसल्याचे भुजबळनी सांगितले.ते म्हणाले की, तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली. राजकारणात यापूर्वी अनेकदा फोडाफोडी झाल्या. मात्र, घराची दारे-खिडक्या उघड्या आहे की बंद असल्यास फूट होऊ शकत नाही, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
तसेच पदवीधर निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसमधील गटबाजी उघड्यावर आली असली, तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत राहणार, असेही भुजबळांनी स्पष्ट शिंदगटाच्या नेमणुकाबेकायदेशीर शिवसेना कोणाची या प्रश्नावरून तर्क वितरक सांगणे नाशिक न्यायालय व निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या लढाईवर बोलताना भुजबळांनी, आम्हीही निकालाची प्रतीक्षा करत आहोत. शिंदे गटाने केलेल्या नेमणुका या बेकायदेशीर असून, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अनेक बाबी असल्याचे त्यांनी सांगितले.
 देवळाली गावात दोन गटात झालेल्या दोन तिनं 
 दिवसांपूर्वी राजकीय वादातून गोळाबार प्रकरणी • भुजबळांना विचारले असता, राजकीय पक्षांनी इथपर्यंत जाऊ नये. मी पालकमंत्री असताना असे घडले तेव्हा अनेक जण ओरडत होते. मात्र,  ते आता बोलत नसून पोलिसांनी कुणाच्याही दबावाला दडपणाला बळी न पडता कारवाई करावी, अशी अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली. मुंबईतील विकासकामे
आघाडीचीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई । दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, पंतप्रधान येतात ते चांगले आहे. मात्र, विकासकामे ही जनतेच्या । पैशांमधून होत असतात. मुंबईतील उद्घाटन झालेली कामे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआमध्ये मंत्री = असताना सुरू झाल्याची टीकाही त्यांनी केली. खा. संजय राऊत यांचा काश्मीर दौरा व तेथे शिवसेनेने निवडणूक लढण्याबाबत उद्धव ठाकरे  निर्णय घेतील, असे भुजबळ सांगितले.

राष्ट्रीय छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गंगाधर (नाना) काळकुटे पाटील यांच्या सुचने नुसार पद् वाटप ?

राष्ट्रीय छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गंगाधर (नाना) काळकुटे पाटील यांच्या सूचनेनुसार व प्रदेशाध्यक्ष श्री निखिल (दादा) गोळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर जिल्ह्याच्या दक्षिण अध्यक्ष पदी श्री बाळा गायकवाड व उत्तर जिल्हा अध्यक्ष पदी श्री रवी पंडित नेवासा तालुका अध्यक्ष पदी श्री सुरज उगले यांची निवड करण्यात आली त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यावेळी प्रवक्ते श्री विशाल भोसले व राजदेव ललन अमर सुपे दिपक देशमुख उपस्थित होते.

#छावा #राष्ट्रीय...                                                   सा राज प्रसारीत सोशल  Web ( Media ) Group तर्फे सर्व छावा संघटना निर निराळे पदावर असल्याले पद अधिकाऱ्यांना पुढील वाटचळ कार्यस हार्दिक अभिनंदन 💐💐💐 🙏♥️ 🇮🇳 तथा शुभेच्छा : संपादक राजु मिर्जा...

15:48

Saturday, January 21, 2023

ATM 7 मिनिटात फोडलं 16 लाख चोरले, दक्ष पोलीसांच्या सतर्कत्यानें चोरटे सापडले ?



( अकोला जिल्हा ) एटीएम चोरीच्या घटनेनंतर सर्व चोरटे पसार झाले आणि तब्बल १६ लाख ५३ हजार रुपये पाच जणांनी सांगणामताने वाटून घेतले. यातील अटकेत असलेल्या युसुफ खान आस मोहम्मद हा चोरीच्या घटनेत नवीन असल्याने त्याच्या वाट्याला १ लाखाच्या जवळपास रक्कम आली. अटकेत असलेल्या चोरट्याकडून गुन्हयामध्ये वापरलेली चारचाकी वाहन अन् ५० हजार रूपये रोख व मोबाईल असा एकत्रित १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.एटीएम चोरीच्या घटनेनंतर स
र्व चोरटे पसार झाले                       
५ जानेवारीला अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला होता., कृष्णा नगर भागात असलेल्या एसबीआयच्या एटीएमला चोरट्यांनी लक्ष्य करून १६ लाखांवर रक्कम पळवून नेली. दरम्यान, चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटर चा वापर केला असून सदरील चोरीच्या घटनेत पाच चोरटे होते. हे सर्व चोरटे बाहेरील राज्यातील आहेत. आता अकोला पोलिसांनी हा एटीएम फोडीचा गुन्हा उघडकीस आणलाय. सम्माधित चोरीच्या घटनेत सहभागी असलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली असून उर्वरित चोरट्यांचा शोध सुरू आहे.
एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने फोडून त्यातून १६ लाख ५४ हजार ३०० रूपये रोख चोरी केली. दरम्यान प्रफुल्ल सुरेश डबरे यांच्या तक्रारीवरून खदान पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासा दरम्यान चोरटे हरियाणा राज्यातील असल्याचे समजले. सलग १२ दिवस तपास करून आज हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. युसुफ खान आस मोहम्मद (वय ३५ वर्ष, रा. पिनागवा ता. पुन्हाना, जिल्हा बुह, राज्य हरियाणा) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात आणखी चार जण सहभागी असल्याचे त्याने सांगितले.
कऱ्हागृह मध्ये असलेल्या चोरट्याकडून गुन्हयामध्ये वापरलेली चारचाकी वाहन अन् ५० हजार रूपये रोख व मोबाईल असा एकत्रित १२ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सददाम माजीद (रा. पडली जिल्हा जुड) अताउल्ला खान (रा. पडली जिल्हा - नुह) सलीम खान हनिफ खान (रा. पिनागवा) संजय यादव (रा. रामगड, जिल्हा अलवर, राजस्थान) हे सदर चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली. लवकरच या चौघांनाही अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
अकोला शहरातील कृष्णा नगरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. या एटीएममध्ये ४ जानेवारीला काही लाखांची रक्कम जमा करण्यात आली. त्यानंतर ५ जानेवारीच्या पहाटे ३ वाजता चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य केले. अवघ्या सात मिनिटांत चोरट्यांनी एटीएम फोडले. अन् एटीएममध्ये असलेली १६ लाख ५३ हजार रुपये रोख लंपास केली. दरम्यान एटीएममधील चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला. तेव्हा या एटीएम चोरीच्या घटनेत चार चोरट्यांचा समावेश असल्याचं समजलं. हे चोरटे चारचाकी वाहनाने गुरुवारी ३ वाजताच्या सुमारास कृष्णा नगरात आलेत. अन् त्यांनी या भागाची बारकाइने पाहणी केली, अन् ३ वाजून ११ मिनिटच्या सुमारास या एसबीआयच्या एटीएमला टार्गेट केलं. गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडले अन् एटीएममधून तब्बल १६ लाख ५३ हजार एवढी रक्कम चोरून लंपास केली 
सदर प्रकरणात या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली असता चोरटे एका पांढऱ्या रंगाच्या वाहनात आल्याचे दिसले. वाहनाचा शोध घेतला असता या गुन्ह्याचा तपास लागला. ही कारवाई अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांच्या मार्गदर्शनात स्पष्टीकरण केली.

Friday, January 20, 2023

ठाकरे आणि शिंदे गटात राडा वादावादीत गोळीबार चा रूप धारण ?


( नाशिक ) सूत्राच्या माहिती नुसार एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केल्याचे स्थानिकांनी ये जा करणारे नि सांगितलं.

 (  नाशिक प्रतिनिधी )  नासिक कमधून एक धक्कादायक बातमी समजते  आहे. नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या गटात जोरदार राडा झाल्याची माहिती आहे. या वादात एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार सुद्धा केल्याचं स्थानिकांनी सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलिस फौज घटना स्थहळी दाखल झाले आहेत.   

समजल्याले माहितीनुसार, नाशकातील (Nashik) देवळाली गावात ही घटना घडली आहे. येथे शिवजयंती साजरी करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमले होते. तर याच ठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते संख्या निदर्शनास आले . यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची तोल बोल झाले आस्थाना 
 दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केली. इक्ष क्षणार्धात तणाव इतका वाढला, की यातील एका गटाने दुसऱ्या गटावर गोळीबार केल्याची माहिती स्थानिकांनी इक्षत्रतील येणारे जाणारे पासून ऐकण्यात आले  या बैठकीवेळी किरकोळ कारणावरून तोल बोल झाली यावरून दोन्ही गट समोर सामने आले. यातून एका गटाने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.                                                                         

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले आहे. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, दोन्ही गटातील कार्यकर्ते निघून गेल्यानं तणाव निवळला आहे. दरम्यान, नेमका कोणत्या गटाने गोळीबार केला? या घटनेचा तपास पोलिसांनी लावण्यास सुरू केला असल्याचे समजते.

Thursday, January 19, 2023

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांना नोटीस पाठविण्यात आलीय.22 हजारांचा कर थकबाकी प्रकरणी ही नोटीस पाठविण्यात आली आहे. ?

( नाशिक प्रतिनिधी )  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या कार्यालयातिलतहसीलदारांनी नोटीस पाठवली आहे. या नोटिशीची सर्वत्र चर्चा आता रंगली आहे. सिन्नरमधील जमीनीचा कर थकवल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.                                                         
याबाबत मिळालेली अधिक माहिती अश्या प्रकारे बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यांची नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या ठाणेगाव जवळ आडवाडी एक जमीन आहे. अडवाडीच्या डोंगराळ भागात सुमारे एक हेक्टर २२ एकर जमीन आहे आणि याच जमीनीच्या एक वर्षाच्या कराचे २२ हजार रुपये थकल्याने नोटीस पाठविण्यात आली आहे. प्रशासनानं ऐश्वर्या राय यांच्यासोबत इतरही बाराशे मालमत्ता धारकांना नोटीस पाठवले आहेत. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने ही नोटीस ऐश्वर्या राय बच्चन यांना पाठवण्यात आले आहे. 


तहसीलदार एकनाथ सांगळे यांनीही ऐश्वर्या रायला नोटीस पाठवली आहे. नोटीस पाठवल्यानंतर दहा दिवसांच्या वेळेत  कर भरला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा देखील इशारा या नोटीस मधून देण्यात आला आहे. २०२२- २३ या वर्षाचा २१ हजार ९६० आणि नोटीशीचा दहा रुपये खर्च असा एकूण२१,९७० रुपयांचा कर बाकी असल्याने तहसीलदारांनी नोटीस पाठवली आहे.                                  

ऐश्वर्या रायला पाठवलेली नोटीस ९ जानेवारी २०२३ रोजी काढण्यात आलेली आहे. ऐश्वर्या राय-बच्चन तिच्यासह तालुक्यातील अन्य थकबाकीदारांना देखील नोटीस पाठविण्यात आली आहे. परंतु एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मालमत्तेचा कर बाकी असल्याने ही नोटीस पाठविण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. बहुतेक हे कर त्यांचे मॅनेजमेन्ट वर्गा  काही वेगळे कारण असु शकतात अगोदर चे पत्र मिळाले नसतील किंवा जंगम मालमत्ता जागो जागी असल्याने काही गोष्टीचा विसर भुल असल्याने हा प्रकार बहुतेक समोर आले अस्तिल लक्ष न ठेवणे असेही होऊ शकतात                                                                
मार्च अखेरीस करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून कर वसूल करण्यासाठी थकबाकीदारांना नोटीस पाठवल्या जातात तसेच कारवाई देखील केली जाते. त्यामुळे ऐश्वर्या राय-बच्चनला देखील सिन्नर तहसीलदारांनी कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नोटीस पाठवली आहे असावेत 
                                     


विश्व स्वप्न सुंदरी खिताब पटकवणारी तसेच बच्चन परिवार चि सून असून कधी आज पर्यंत च्या काळात लि प्रसिद्ध अभिनेत्री ईश्वर्या रॉय या नावाने ओळखल्या जाणारी नट तिच्या संदर्भात विचार केल्यास अर्शयजनक चित्र डोळ्या समोर दिसतात ईश्वर्या च्या दृष्टीकोनातून महत्व कक्षा रक्कम असु शकते का 22 हजार शासकीय कर भरण्यासाठी शासनाला नौटीस बजावून अंमलनात आनून का पाठवण्यात आल्याचे वार्ता पसरताच वेग वेगळे तर्क वितरक लावण्याचं येत असल्याचे समजते आहे.